Panchayat Samiti nashik news esakal
नाशिक

Nashik News : 2 महिन्यानंतरही अहवाल प्रलंबित! चौकशी समितीकडून तक्रारदाराचीच उलट तपासणी

सकाळ वृत्तसेवा

सटाणा (जि. नाशिक) : भाक्षी (ता.बागलाण) ग्रामपंचायतीत झालेल्या लाखो रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नियुक्त चौकशी समितीने तक्रारदार यांची उलट तपासणी करून अपमानास्पद वागणूक दिली.

त्यामुळे या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी व चौकशी अहवाल सादर करावा अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा प्रकाश देवरे, पंकज कापडणीस, गोरख देवरे यांनी दिला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त यांना देखील निवेदन देण्यात आले. (Report pending even after 2 months Cross examination of complainant itself by Inquiry Committee Nashik News)

भाक्षीचे विद्यमान सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतच्या विकास कामांच्या निधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार येथील प्रकाश देवरे, पंकज कापडणीस व गोरख देवरे यांनी गेल्या ५ व ९ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.

तक्रारीनुसार शासनाने निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी सुहास शिंदे व शाखा अभियंता यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. समितीने चार नोव्हेंबर २०२२ रोजी भाक्षी ग्रामपंचायतीस भेट दिली व तक्रारकर्ते यांना बोलावून घेतले होते.

त्यावेळी माहिती अधिकारात प्राप्त माहितीप्रमाणे दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत रमाई नगर, आंबेडकर नगर व बौद्ध नगर कुठे आहेत याची आपण प्रत्यक्ष पाहणी करावी, भाक्षी गावातील स्मशानभूमीच्या जागेवरील मुरूम चोरीची पाहणी करावी, बेकायदेशीरपणे वितरित केलेल्या मोकळ्या भूखंडाची माहिती जाणून घ्यावी, तसेच निकृष्टपणे केलेल्या इतर कामांची ही प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करून घ्यावी अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

मात्र समितीतील अधिकाऱ्यांनी काही एक ऐकून न घेता ग्रामसेवकाने आम्हाला माहिती दिलेली आहे. आम्ही पाहून घेऊ तुम्ही आता येथून जा असे म्हणत तक्रारकर्त्यांची बोळवण केली.

किमान आम्ही केलेल्या तक्रारीनुसार कामांची पाहणी तरी करून घ्या अशी तक्रारदार यांनी विनंती केली. त्यावर आमच्या पद्धतीने आम्ही चौकशी करू असे उद्धटपणे उत्तर देऊन तक्रारदारांनाच अपमानित केले.

त्यामुळे तक्रारदार प्रकाश देवरे व इतरांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे निवेदन देऊन या भ्रष्टाचाराची निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी केली असून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

"चौकशी समिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून लाखो रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचा फार्स केला. फक्त ग्रामपंचायतीस भेट देऊन चौकशी केल्याचा बनाव केला आहे. दोन महिने उलटूनही अहवाल देण्यात आलेला नाही. म्हणून विभागीय आयुक्त यांच्याकडे पुन्हा तक्रार करत बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे."

- प्रकाश देवरे, तक्रारदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT