Slogans against public representatives esakal
नाशिक

Nashik News : पेठ रोड दुरुस्तीसाठी रहिवासी आक्रमक; NMC, लोकप्रतिनिधीच्या विरोधात घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : पेठ रोडची अक्षरशः चाळण झाली असून, वाहन चालवताना अतिशय कसरत करावी लागत आहे. तर, रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून रस्त्याच्या कामासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवारी (ता. २१ ) नागरिकांनी आक्रोश करत पेठ रोडवरील मेघराज बेकरी समोर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी रास्ता रोको न करण्याचे आवाहन केल्याने पोलिस व नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. (Residents Aggressive for Peth Road Repair Slogans against NMC People Representative Nashik Latest Marathi News)

पेठ रोडवरील हनुमान चौक राऊ हॉटेल ते महापालिका हद्दीपर्यंत रस्त्याची भयानक दुरवस्था झाली आहे. या जवळपास अडीच ते तीन किलोमीटर रस्त्याची चाळण झाली असून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने तसेच इतर वाहनांचा मोठा राबता असल्याने रस्त्यावरील धुळीने रस्त्यालगतच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नागरिकांनी महापालिका आयुक्त तसेच संबंधित प्रशासनाशी वेळोवेळी निवेदन, पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना तीव्र संताप झाल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. सकाळी दहाच्या सुमारास परिसरातील वैद्यकीय व्यावसायिक तसेच नागरिक व महिला मेघराज बेकरी समोर जमा झाले. महापालिका व लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत महापालिकेचे अधिकारी येत नाही, तोपर्यंत रास्ता रोको करण्यात येईल असे सांगितल्यावर पोलिसांनी विरोध केला.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

परंतु, नागरिक पोलिसांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मनपा प्रशासनाची चर्चा घडवून देतो, असे सांगितल्यावरही काही राजकीय व्यक्तींनी विरोध केल्यावर त्यांना पोलिसांनी पोलिस गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. अखेर जर मनपाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात याबाबतीत लक्ष न घातल्यास पुन्हा नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा दिला.

आंदोलनात प्रभाकर पिंगळे, सोमनाथ पिंगळे, दिलीप पिंगळे, राजेंद्र ठाकरे, महेश शेळके, सुनील निरगुडे, प्रतीक पिंगळे, विजय पिंगळे, योगेश कापसे, पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देवरे, डॉ. सचिन भांबेरे, डॉ. हेमंत साबळे, डॉ. मनीष देवरे, सचिन पवार, दर्शन बोरसे, विलास आवारे आदींसह पेठ रोडवरील मेघराज बेकरी समोरील वेदनगरी, इंद्रप्रस्थनगर आदी भागातील महिला व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT