eikya building mired in controversy esakal
नाशिक

Nashik Fraud: पैसे भरूनही रहिवाशांना काढले घराबाहेर! मुंबईच्या विकासकांकडून नाशिकच्या रहिवाशांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud : मुंबईच्या विकासकाकडून कर्जाची परतफेड होत नसल्याने मानूर येथील पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांचा ताबा घेण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. २०) सुरू केली.

रहिवाशांनी कर्ज काढून हप्ते पूर्ण भरूनही ऐन पावसाळ्यात घराबाहेर काढून आमच्यावर अन्याय करण्यात आल्याचा दावा १४ रहिवाशांनी केला आहे. पैसेही गेले आणि घरही गेल्यामुळे या रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासन आणि बिल्डरच्या संघर्षात रहिवाशांना रस्त्यावर यावे लागले आहे. (Residents kicked out even after paying money Nashik residents cheated by Mumbai developers Nashik Fraud)

नाशिकचे अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई होत असल्याचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.

दशक शिवारात मुख्य हायवे नांदूर नाक्याहून जेल रोडकडे जाताना डाव्या हाताला नदीकाठी ऐक्य ही सहामजली इमारत आहे. येथे ९० फ्लॅट आहेत. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत केंद्र सरकारकडून दोन लाख ६७ हजार रुपये अनुदान मिळत असल्याने गरीब, मध्यमवर्गीयांनी मोठ्या आशेने बॅंकांची कर्जे घेऊन येथे प्लॅट घेतले.

परंतु, गृहप्रकल्प साकारण्यासाठी मुंबईच्या विकसकाने इंडिया होम लोन कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाही. त्यामुळे हा प्रकल्प अडचणीत आला. सिक्युरिटायजेशन कायद्याचा आधार घेऊन या प्रकल्पातील मालमत्ता जप्तीची कारवाई जिल्हा प्रशासनाने सुरू केली.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी वित्तीय मालमत्तेचे संपादन व पुनर्रचना आणि तारण हक्काची अंमलबजावणी अधिनियम, २००२ मधील कलम १४ (१) नुसार कारवाई केली. विकसकाने इंडिया होम लोन कंपनीकडून कर्ज घेण्यापूर्वी काही प्लॅटची विक्री झाल्याचा व त्याबाबतची एनओसी असल्याचा दावा रहिवाशांनी केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तरीही बाहेर काढल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या इमारतीत हातावर काम करणारे लोक राहतात महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी भरूनही येथे कोणतीच सुविधा नाही. मुंबईच्या विकसकानेही सुरक्षा भिंतीसह अन्य कामे अर्धवट ठेवली आहे. या योजनेत ९० प्लॅट तयार आहेत.

मात्र, मालमत्ता जप्तीबाबत जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नोटिशीत ११० प्लॅट जप्त करण्याची नोंद असल्याचे रहिवाशांनी सांगितले. १४ रहिवाशांना सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आले.

कारवाईवेळी नारळ विक्रेत्या रहिवाशांच्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आला. हप्ते भरूनही घराबाहेर काढल्यामुळे काही रहिवासी आडगाव पोलिसांकडे तक्रार करण्यास गेले. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे प्रशासन वकील लावा असा सल्ला रहिवाशांना देत आहे. वकील लावायला आमच्याकडे पैसे नाही, असे रहिवासी सांगत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड; ख्रिस गेल स्टाईल सेलिब्रेशन

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

SCROLL FOR NEXT