Foul smelling water flowing in the narrow lane while concreting is going on esakal
नाशिक

Nashik News: दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे राजीवनगरचे रहिवासी हैराण! ड्रेनेज समस्या सोडविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

तातडीने येथील ड्रेनेज समस्या सुटली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : राजीवनगर वसाहतीमध्ये खासदार हेमंत गोडसे यांच्या विकास निधीतून सुरू असलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरण दरम्यान येथील खासगी चेंबर तसेच स्वच्छतागृहामधून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे काम करणाऱ्या कामगारांसह येथील रहिवासी हैराण झाले आहे.

तातडीने येथील ड्रेनेज समस्या सुटली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी दिला आहे. (Residents of Rajivnagar shocked due to smelly water Alert of movement to solve drainage problem Nashik News)

या वसाहतीची दर्शनी बाजू १०० फुटी रस्त्यावर आहे. त्यामुळे तेथे ड्रेनेज आदी सुविधा आहेत. मात्र अंतर्गत गल्ल्या अवघ्या दीड ते दोन मीटरच्या आहेत. त्यात अनेकांनी स्वखर्चाने स्वच्छतागृहांची सोय करून घेतली आहे.

मात्र येथे ड्रेनेज लाईनच नसल्याने येथील तात्पुरते ड्रेनेज ओव्हर फ्लो होऊन हे पाणी आता या गल्लीतून वाहण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या खासदारांच्या निधीतून काँक्रिटीकरण सुरू आहे.

मोठे मशिन आत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे लोखंडी पाइपद्वारे काँक्रिट पाठविले जाऊन हे काँक्रिटीकरण सुरू आहे. सध्या या कामगारांनीच बऱ्यापैकी हे ड्रेनेज साफ केले असले तरीदेखील कायमस्वरूपी ते होणे गरजेचे आहे.

वसाहत अधिकृत आणि अनधिकृत हा विषय असला तरीदेखील येथे माणसेच राहतात याचा विचार करून महापालिकेने येथील ड्रेनेज व्यवस्था मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा या भागातील लोकांसह आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

या वेळी जाधव यांच्यासह शैलेश कार्ले, अमोल वऱ्हाडे, सोपान जाधव, रावसाहेब मकासरे, गणेश तुपसुंदर, ऋतिका अंभोरे, सौ. गायकवाड, शिवाजी सावंत, नीता अंभोरे, दिनकर जाधव, गौतम जाधव, श्रीमती मुळे, रत्नमाला पाऊल, रंजना चव्हाण आदींसह महिला आणि नागरिक उपस्थित होते.

"येथे माणसे राहतात याचा विचार करून महापालिकेने ड्रेनेजची सुविधा केली पाहिजे. सध्या काँक्रिटीकरण दरम्यान संबंधित ठेकेदाराला दोन्ही बाजूंकडून ड्रेनेज आणि पाण्याच्या लाईनसाठी जागा सोडण्यास सांगितले आहे. तातडीने महापालिकेने ही सुविधा द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल." - अमोल जाधव, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT