Nashik News : शहरी भागासह ग्रामीण भागातही पर्यावरणाचा सर्रासपणे ऱ्हास होताना दिसून येत आहे. पर्यावरणाचे संवर्धन व संगोपन करायचे असेल तर एक लोकोपयोगी चळवळ उभारावी लागणार आहे.
लहान वयापासूनच ही सुरवात झाली तर भविष्यात याचा नक्की फायदा होईल या उद्देशाने जामुंडे गावात इगतपुरी तालुका पर्यावरण मंडळाचे उपाध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षक अतुल आहीरे यांनी एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. (Resolution to make Jamunde village plastic free initiative of Taluka Environment Board Nashik News)
केंद्र शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिकमुक्त भारत अभियानासारखे प्लास्टिकमुक्त गाव साकारण्याचा संकल्प जामुंडे शाळेतील विद्यार्थ्यांनी केला आहे. या पवित्र कामात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.
घरातील लहानांपासून ते थोरांपर्यंत कुणीही सहज करू शकतील असे साधे प्रयोग करून जागृती अभियानाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक घरामध्ये दररोज कमीत कमी एक किंवा जास्त प्लास्टिकची पिशव्या येतात. यात तेल पिशवी, दुध पिशवी, किराणा पिशवी, शॅम्पू, साबण, मॅगी, कुरकुरे यांचा समावेश असतो.
या पिशव्या कचऱ्यामध्ये न टाकता, दररोज मोकळ्या पाण्याच्या बाटलीमध्ये टाकायच्या आहेत. आठवड्यातून एकदा भरली कि ती बाटली व्यवस्थित टोपण लावून कचऱ्यात टाकू शकता. जेणेकरून विस्कटलेले प्लास्टिक जनावर खाणार नाहीत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
प्लास्टिक कचऱ्याची आणि पाण्याच्या बाटलीची व्यवस्थित विल्हेवाट लागेल. कचरा विभागाला कचरा जमा करायला पण सोयीस्कर होईल. एवढ्या एका लहान कामातून पर्यावरण, पृथ्वी आणि येणाऱ्या पिढीला खूप मोठा फायदा होणार आहे असे अतुल आहीरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या उपक्रमास शालेय विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक अनिल शिरसाठ, निशांत पगार, अमोल बावा, सविता गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभले.
"शहरापासून ते गावातील प्रत्येक घरात ही चळवळ उभी राहण्याची गरज आहे, हिच गरज ओळखून प्रत्येक घराने या शुभ कार्याला सुरूवात करावी."
- अतुल आहीरे, उपाध्यक्ष, इगतपुरी तालुका पर्यावरण मंडळ.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.