नाशिक : (कळवण) पुरुषप्रधान संस्कृतीत कुटुंब नियोजनाचा भार केवळ महिलांचाच खांद्यावर दिसून येतो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुरुष व स्त्री या दोघांनाही करता येते. मात्र, कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलाच पेलताना दिसून येत आहेत.
"हम दो- हमारे दो''
पुरुषप्रधान संस्कृतीत कुटुंब नियोजनाचा भार केवळ महिलांचाच खांद्यावर दिसून येतो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुरुष व स्त्री या दोघांनाही करता येते. मात्र, कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलाच पेलताना दिसून येत आहेत. ही बाब जिल्ह्यात मागील पाच वर्षांत एक लाख 26 हजार 814 स्त्रियांची, तर केवळ सात हजार 490 पुरुषांची नसबंदी झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. संसाराचा गाडा पती-पत्नी या दोन चाकांवर चालतो. पूर्वी "हम दो- हमारे दो', अशा छोट्या कुटुंबाला पती- पत्नीकडून प्राधान्य दिले जात होते. सध्या बहुतांशी कुटुंब एकच अपत्य पुरेसे असल्याचे सांगून संतती नियमन करतात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुरुष व स्त्री या दोघांनाही करता येते. मात्र, कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलाच पेलतांना दिसून येत आहेत. बहुतांशी वेळा स्त्रिया स्वतःहून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतात. नसबंदीबाबत पुरुषांमध्ये अनेक गैरसमज आहेत.
पुरुष नसबंदी टाळण्याची कारणे
- नंपुसकता येण्याचा गैरसमज
- स्त्रियांकडून होणार विरोध
- पुरुष सहजासहजी तयार होत नाही
- स्त्रियांनीच नसबंदी करावी, ही पारंपरिक मानसिकता
- पुरुष नसबंदीविषयी अंधश्रद्धा असणे
वर्ष पुरुष शस्त्रकिया स्त्रिया शस्त्रकिया
उद्दिष्ट साध्य उद्दिष्ट साध्य
2013-14 1,500 1,527 24,650 25,129
2014-15 981 1,457 25,402 22,932
2015-16 981 1,305 25,402 21,703
2016-17 2,244 1,109 24,722 18,639
2017-18 2,244 944 24,722 17,449
2018-19 2,244 1,128 24,722 20,992
नाशिक जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अल्प आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. बहुतांश कारणे गैरसमजामुळे निर्माण झाली आहेत. स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या तुलनेत पुरुष नसबंदी सोपी आहे. त्यामुळे पुरुष नसबंदीबाबत असलेले गैरसमज दूर होणे काळाची गरज आहे. - डॉ. अनंत पवार, जिल्हा निवासी अधिकारी
मी देवळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शत्रक्रिया करून घेतली. शस्त्रक्रिया सहज पार पडली. आठवडाभरात नेहमीची कामे करायला लागली. या शस्त्रक्रियेत अजिबात धोका नाही. - उषा देवरे, रुग्ण, खर्डे (ता. देवळा)
हेही वाचा > 'ती' आडलेल्या अवस्थेत...पण, काय अन् कसं करायचं 'त्यांना' काहीच माहिती नव्हतं...शेवटी
गेल्या पाच वर्षांपासून लसीकरण करताना बालकांच्या माता-पित्यांच्या कुटुंब नियोजनाविषयी समुपदेशन करत आलोय. अनेक स्त्रिया योग्यवेळी शस्त्रकिया करवून घेण्यास तयार होतात. मात्र, पुरुष अपवादानेच तयार होतात. याकामी पुरुषांनी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा. - कुणाल कोठावदे, लसीकरण आणि कोल्ड चेन मॅनेजमेंट विभाग
हेही वाचा > 'माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील!'...असं म्हणणारे 'आमदार' विधानसभेच्या उपाध्यक्षपदी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.