Late Pramod Nikalje esakal
नाशिक

Nashik Crime News : ओझर येथील खून प्रकरण प्रेम संबंधातून झाल्याचे उघडकीस

उत्तम गोसावी

ओझर (जि. नाशिक) : दि. १२/०१/२०२३ रोजी ओझर पोलीस ठाणे हद्दीत आंबेडकरनगर, ओझर परिसरात इसम प्रमोद निकाळजे वय ३२, रा. ओझर, ता. निफाड यास कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरून कोणत्यातरी हत्याराने त्याचे शरीरावर वार करून गंभीर दुखापत करून खून केला, म्हणून ओझर पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. ०४/२०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. (revealed that murder case in Ozar due to love affair Nashik Crime News)

सदर खुनाचे गुन्ह्याचे तपासात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमप यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग श्री. अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील व ओझर पोलीस ठाण्याचे पोनि श्री अशोक रहाटे यांनी घटनास्थळास भेट देवून पाहणी केली.

यातील मयत इसम प्रमोद निकाळजेबाबत सविस्तर माहिती घेवून मयत हा घटनेच्या दिवशी कोणा- कोणास भेटला तसेच त्यास शेवटचे कोणासोबत पाहीले याबाबत तपास सुरू केला. त्याप्रमाणे मयत राहत असलेल्या परिसरातील प्रत्यक्ष साक्षीदारांना पोलीस पथकांनी सविस्तर विचारपूस केली.

गुन्हे तपासात मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे पटच्या दिवशी मयताचे दोन इसमासोबत बाद झाले असल्याचे खात्रीशीररित्या समजलेवरून तपास पथकाने ओझर गावातून संशयित जयेश देवराम भंडारे, संदिप मधुकर बनसोडे दोन्ही रा. आंबेडकर नगर, ओझर यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्यांनी दि. १२/०१/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास यातील मयतास तलवारीने, चॉपरने डोक्यावर, तोंडावर हातांवर वार करून गंभीर जखमी करून जीव ठार मारले, असल्याचे उघडकीस आले आहे.

यातील मयत प्रमोद निकाळजे व आरोपी जयेश भंडारे या दोघांचे ओझर येथील एकाच महिलेशी प्रेमसंबंध होते, यावरून दोघांमध्ये वाद होवून आरोपी जयेश भंडारे व त्याचा मित्र संदिप बनसोडे या दोघांनी मिळून यावर तलवारीने व चॉपरने वार करून जीवे ठार मारले आहे. यातील दोन्ही आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास ओझर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सदर खूनाचे गुन्हयाचे तपासात अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग श्री. अर्जुन भोसले यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, ओहार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अलोक हाटे, पो. उ. नि. अर्चना तोडमल, किशोर आहेरराव, पो. ना. विश्वनाथ पावले, दिपक गुंजाळ, अनुपम जाधव, बंडू हेगडे, पो. कों. जितेंद्र बागुल, रमेश चव्हाण, झामरु सुर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशी तसेच स्वागताचे स. पो. उ. नि. रविंद्र वानखेडे, पो. हवा. जालिंदर खराटे, पो. ना. नवनाथ वाघमोडे, रविंद्र टलें, सागर काकड यांचे पथकाने अहोरात्र मेहनत करून ओझर शिवारात तळ ठोकुन सदर खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले.

वरील खुनाच्या गुन्हयात उत्कृष्टरित्या तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी तपास पथकास १५,०००/-रु चे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT