Namami Goda Project esakal
नाशिक

Namami Goda Project: ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी सुधारित आराखडा; नदी संवर्धन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे नियोजन

दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नाशिक महापालिकेचा सोळावा क्रमांक आला.

सकाळ वृत्तसेवा

Namami Goda Project : दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नाशिक महापालिकेचा सोळावा क्रमांक आला. परंतु पहिल्या दहामध्ये क्रमांक न येण्यामागे मलजल शुद्धीकरण केंद्रांची अकार्यक्षमता कारणीभूत ठरली असून, नदीत अशुद्ध पाणी सोडले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे महापालिकेने महापालिकेने ‘अमृत २’ योजनेऐवजी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत नमामि गोदा प्रकल्पासाठी सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. (Revised Plan for Namami Goda Project by nmc nashik news)

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण राबविले जाते. सर्वेक्षणानंतर स्वच्छ शहरांचा निकाल जाहीर केला जातो. २०२३ या वर्षासाठी नाशिक महापालिकेने देशभरातील स्वच्छ शहरांच्या यादीत सोळाव्या स्थानापर्यंत मजल मारली. स्पर्धेत सहभागी असलेल्या देशभरातील चार हजार ४७० शहरांमध्ये नाशिकने ७५ व्या स्थानावरून ३९ व्या क्रमांकावर स्थानावर झेप घेतली.

क्रमवारीत सुधारणा झाली, मात्र असे असले तरी पहिल्या दहा शहरांमध्ये येण्याचे स्वप्न भंगले आहे. त्याला कारण म्हणजे दहा लाखांपुढील लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नाशिक महापालिकेला सोळावा क्रमांक मिळविला. मलजल शुद्धीकरण केंद्राची क्षमतावाढ करणे आवश्‍यक होते. ही प्रक्रिया राबविण्यासाठी महापालिकेकडे निधी नाही.

मलजल शुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासह मलवाहिकांचे नवीन जाळे विकसित करण्यासाठी महापालिकेला ५३० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. महापालिकेने केंद्र सरकारच्या ‘अमृत-२’ योजनेंतर्गत निधी मागण्याची तयारी केली होती. परंतु, या योजनेंतर्गत ५० टक्के निधी महापालिकेला मिळणार होता, तर ५० टक्के निधी महापालिकेला खर्च करावे लागणार होते.

५० टक्के निधीचे दायित्व महापालिकेवर येणार होते. मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने भुयारी गटार व्यवस्थापन विभागाने नमामि गोदा प्रकल्पांतर्गत निधी मागण्याची तयारी सुरू केली आहे. नमामि गोदा प्रकल्पांतर्गत मलवाहिकांची दुरुस्ती, क्षमतावाढ व सुधारणा करणे, मखमलाबाद व कामटवाडा येथे मलनिस्सारण केंद्रांची उभारणी करणे.

नवीन विकसित झालेल्या नगरामध्ये मलजल व सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यासाठी सिव्हर लाइनचे जाळे टाकणे, नदी किनारा अत्याधुनिक करणे व गोदावरी नदीवर विविध घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे प्रस्तावित आहे. त्यामुळे मलजल शुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढ करण्यासाठी हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेला जोडला जाणार आहे.

प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च (कोटीत)

- नवीन मलनिस्सारण केंद्र उभारणे -६२२.०९

- मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण व सांडपाण्यावर प्रक्रिया- ३९८.१८

- जुन्या मलवाहिका बदलणे- ९२७.३४

- नदीघाट विकास व सौंदर्यीकरण करणे- ८३२.६३

''मलजल शुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेत वाढ करणे आवश्‍यक आहे. ‘अमृत २’ योजनेंतर्गत प्रकल्प मंजूर झाला तरी पन्नास टक्के दायित्वाचा भार पेलावा लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत नमामि गोदा योजनेचा प्रस्ताव सादर करण्याचे नियोजन आहे.''- संजय अग्रवाल, अधिक्षक अभियंता, मलनिस्सारण विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT