नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर २०२३ मध्ये घेतलेल्या एमए जेएमसी ( जनसंज्ञापन आणि पत्रकारिता) परीक्षेच्या निकालात झालेल्या चुका दुरुस्त करून परीक्षा विभागाने सुधारित निकाल जाहीर केला आहे.
सकाळ ने आज यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. (Revised results of journalism courses announced by savitribai phule pune university nashik news)
विद्यापीठाने तातडीने दखल घेत, संगणकीय तांत्रिक चुकांची दुरुस्त करीत त्वरित आज सुधारित निकाल जाहीर केल्याने विद्यार्थी पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. आधी जाहीर केलेल्या निकालानुसार नापास झालेले विद्यार्थी सुधारित निकालात पास झाले आहेत.
निकालपत्र तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या संगणकीय प्रणालीत काहीतरी दोष निर्माण झाल्याने निकाल चुकीचे लागले होते.
यासंदर्भात वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची आणि महाविद्यालयांनी केलेल्या तक्रारींची विद्यापीठाने दखल घेतली. गेल्या दोन दिवसांत सुधारित निकाल तयार करून तो जाहीर करण्यात आला.
परीक्षा समितीचे चेअरमन गणेश शेणई यांनी विद्यापीठात जाऊन चुका विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिल्या. परीक्षा विभागाने चुका मान्य करून सुधारित निकाल तयार करण्याची तातडीने कार्यवाही केली. त्यानुसार सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.