Saptashrungi devi gad esakal
नाशिक

Saptsrungi Devi Gad : सप्तशृंगगडावरील ऐतिहासिक कुंडांच्या पुन्नरुज्जवीनास सुरवात

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेेवा

वणी : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील १०८ ऐतिहासिक कुंडांच्या पुन्नरुज्जवीनासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असून, १०१ पैकी प्रथमदर्शनी अस्तित्वात असलेल्या ४२ कुंडांचे प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले. यात १६ कुंडे पूर्ण बुजलेल्या अवस्थेत आहेत, तर २६ कुंडांमध्ये कमी-जास्त प्रमाणात जलस्त्रोत आहे.

उर्वरित ६६ कुंडांचा शोध व त्याचे सर्वेक्षण प्रशासनास करावे लागणार असून, हे सर्व कुंड पुनरुज्जीवित झाल्यास आद्यशक्तिपिठाचे धार्मिक महत्त्व वाढीबरोबरच गडावरील जलस्त्रोतातही वाढ होऊन पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

सप्तशृंगगडावर वर्षभरात ६० ते ७० लाख भाविक भगवतीच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी सप्तशृंगगडापासून चार किलोमीटरवर १९९७-९८ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत भवानी पाझर तलावाची क्षमता वाढवून आठ एमसीएफटी करण्यात आली.

२० वर्षात गडावर येणाऱ्या वाढत्या भाविकांची संख्या लक्षात घेता ही पाणी क्षमता अपूर्ण पडत असल्याने तसेच तलावास गळती असल्याने ३० टक्के पाणी वाया जात होते. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने साठवण क्षमताही कमी झाली होती. त्यामुळे २०१८ मध्ये ग्रामपंचायतीने भवानी तलावाची गळती थांबविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाने दोन कोटी ४९ लाख ७१ हजारांचा निधी मंजूर करीत गळती रोखण्याचा प्रयत्न केला होता.

त्यामुळे गडावरील उन्हाळ्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी झाली असला तरी भाविकांची गर्दी व गडावरील लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याचा साठा कमी राहात असल्यामुळे गडावरील रहिवासी व न्यासास पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायीकांबरोबरच ग्रामपंचायत व ट्रस्टला पाणी वाहून आणण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

याच अनुषंगाने पालकमंत्री दादा भुसे यांनी सप्तशृंगगडाचा विकास आराखड्यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी नाशिक येथे झालेल्या आढावा बैठकीत उन्हाळ्यात गडावर पाणीटंचाई दूर करण्यासाठी भवानी तलावाची उंची वाढवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्याबाबत तसेच गडावरील १०८ पुरातन कुंडाचा शोध त्यांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तसेच ६ डिसेंबर २०२२ ला विकास आराखडा बैठकीत भुसे यांनी १०८ कुंडांतील विविध कुंडांचे दुरुस्तीचे प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सादर करावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार सप्तशृंगगड येथील पुरातन कुंडांचा शोध घेवून सदर कुंडाचे जिओ टैग फोटो घेण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले होते.

या पथकाने १०८ कुंडांपैकी ४२ कुंडे शोधले असून, त्याची माहीती जिल्हाधिकारी कार्यालयास दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरण. डी. यांनी नुकतीच सप्तशृंगगडावर अस्तित्वात असलेल्या कुंडांची पाहाणी केली असून, आदिशक्तीपीठातील प्राचीन कुंडांचे पुनरुज्जीवन कामास प्रारंभ होण्याची कार्यवाही होणार असल्याने गडावरील १०८ कुंडाचे असलेले धार्मिक महत्व भाविकांसमोर प्रत्यक्षात येण्याबरोबरच जलस्त्रोत वाढून भाविकांबरोबरच गडावरील पशु, पक्षी व वन्यप्राण्यांनाही याचा फायदा होणार आहे.

पूर्ण बुजलेले १६ कुंड

दत्त कुंड, आत्माराम कुंड, गावठाण विहीर, लक्ष्मी कुंड, म्हाष्टी कुंड, चक्र तिर्थ कुंड, नगरखाना विहीर, गुरुदेव आश्रम विहीर, तांबडी माती कुंड, देवकाष्टी, चंडीबाबा कुंड, देवझरा, भवरी कुंड, नाडगा, उबऱ्या कुंड, नेताळे कुंड

कमी-जास्त जिवंत जलस्त्रोत असलेले कुंड

सूर्यकुंड, कालीकुंड, नवसपूर्ती कुंड (बारव), पंजाबी कुंड, विटाळ कुंड, चांभा-या विहीर, सरकारी विहीर, शिवालय तलाव, महादेव विहीर, खर्जा कुंड, जमुना कुंड, गंगा कुंड, सरस्वती कुंड, लांब कुंड, महार तलाव, गणेश कुंड, गुरुदेव आश्रम विहीर क्र. २, चंबोली विहीर ( भक्तांगण), देवनळी कुंड, देवकुंड, थोड्या कुंड, कोड्या कुंड, उंबरकुंड, अष्टकोणी बारव कुंड, काजल तिर्थ, उंबरझोती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT