Nashik News : पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार आल्यानंतर त्याचा पहिला सकारात्मक परिणाम हा रिंगरोडच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तयार केला जाणारा ५६ किलोमीटरच्या रिंगरोडचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी पुणे येथील मोनार्च या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
रिंगरोडचे नामकरणदेखील करण्यात आले असून आता ‘सिंहस्थ परिक्रमा मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. (Ring Road Named Simhastha Parikrama Marg Survey by Monarch Institute Pune Nashik News)
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेकडून नियोजन सुरू झाले आहे. या नियोजनाचा एक भाग म्हणून बाह्यवळण रोड तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाला दिला. जवळपास ५६ किलोमीटर लांबीचा रिंगरोड दोन टप्प्यात तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
रिंगरोड तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी महापालिकेला रोख स्वरूपात मोबदला देण्याची आर्थिक परिस्थिती नाही. टीडीआर स्वरूपात मोबदला दिला तरी मोठ्या प्रमाणात टीडीआर द्यावे लागेल.
यामुळे भविष्यात टीडीआरचे भाव कोसळण्याबरोबरच शेतकरी तो पर्याय स्वीकारतील की नाही, याबाबत साशंकता असल्याने महापालिकेने राज्य शासनानेच रिंगरोडसाठी निधी देण्याची मागणी केली.
पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे पूर्वी बंदरे व खनिकर्म मंत्री हे पद होते. मध्यंतरीच्या काळात सत्ताकारणात झालेल्या बदलात भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचा कारभार आला.
त्या वेळी मंत्री भुसे यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेला पाठविण्याचे निर्देश दिले होते.
महापालिकेने रस्ते विकास महामंडळाला प्रस्ताव सादर केल्यानंतर रिंगरोड कामाला गती मिळाली असून, पुणे येथील मोनार्च या सल्लागार संस्थेची नियुक्ती सर्वेक्षणासाठी करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून रिंगरोडचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
५६ किलोमीटरचे रिंगरोड
शहरात येणारी वाहतूक बाह्यवळण रस्त्याद्वारे वळविण्यासाठी २६ व ३० किलोमीटरचे दोन असे एकूण ५६ किलोमीटरचे रिंगरोड तयार केले जाणार आहे.
महापालिका खत प्रकल्पापासून पाथर्डी शिवारातून वालदेवी नदीला समांतर पिंपळगाव खांब शिवार, तसेच पुढे वालदेवी नदी पलीकडे विहीतगाव शिवार, विहीतगावपासून पुढे नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून चेहेडी शिवारातून पंचक गाव पुढे माडसांगवी शिवारातून महापालिका हद्दीबाहेर औरंगाबाद रोडलगत आडगाव शिवार व ट्रक टर्मिनसपर्यंत साठ मीटरचा पहिला रिंग रोड आहे.
तर आडगाव ट्रक टर्मिनस येथून ३६ मीटर रुंदीचा दुसरा रिंग रोड आहे. आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, नाशिक तालुक्यातील जलालपूर, बारदान फाटा, गंगापूर रोड, ओलांडून गंगापूर उजवा तट कालवा, सातपूर एमआयडीसी, पश्चिम भागालगत त्र्यंबक रोडपर्यंत व पुढे गरवारे पॉइंटपर्यंत दुसरा रिंग रोड आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.