Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : माजी आमदार आसिफ शेख यांच्याविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी श्री. शेख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. ५) महापालिकेत जोरदार घोषणाबाजी करत आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासले होते.

श्री. शेख यांनी आयुक्तांवर ठेकेदारांचे धनादेश देण्यासाठी व विविध विकास कामांसाठी बजेट देताना अंदाजपत्रकीय तरतूद करण्यासाठी दहा टक्के घेत असल्याचा आरोप केला. (Riot case against former MLA Asif Shaikh nashik crime news)

महिला बचत गटाच्या पोषण आहार ठेक्यासाठी पाच मनपा अधिकाऱ्यांवर पाच लाख रुपयांची मागणी केली. मुकुंदवाडीतील अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ केली. दूरध्वनी करुनही कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. असे विविध आरोप करत जोरदार टीका केली. आयुक्त कार्यालयात असते तर त्यांच्या तोंडाला काळे फासले असते असा इशारा दिला होता.

यावेळी कार्यकर्त्यांनी कमिशनर मुर्दाबाद, दादागिरी नही चलेगी, चोरी चमारी नही चलेगी, कमिशनखोरी नही चलेगी, चोर कमिशनर मुर्दाबाद यांसह विविध घोषणाबाजी केली. आंदोलनकर्ते महानगरपालिकेत हाताला काळी व निळी शाई लावून आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापालिका आयुक्तांविरुद्ध भ्रष्टाचार, गैरव्यवहार, कमिशनखोरी असे विविध प्रकारचे आरोप करत महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर गोंधळ, घोषणाबाजी व आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्त्यांविरुद्ध किल्ला पोलिस ठाण्यात दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी महानगरपालिकेचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी परेश खलचे (वय ३६) यांच्या तक्रारीवरून श्री. शेख यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, आयुक्तांच्या नावाने बदनामीकारक घोषणाबाजी व त्यांच्या तोंडाला काळे फासण्याच्या उद्देशाने येऊन नाम व पदाच्या फलकाला काळी व निळी शाई चोपडून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saud Shakeel खेळला म्हणून पाकिस्तान पुढे जाऊ शकला; इंग्लंडविरुद्ध घेतली आघाडी

Beed Assembly Election 2024 : तर उमेदवार मीच असायला हवे , आमदार प्रकाश सोळंकेंनीच मागितली पक्षाकडे उमेदवारी

भीक मागून १ लाख इन्कम! भारतातल्या 'या' शहरात भिकाऱ्यांची नोकरदारापेक्षा जास्त कमाई, सरकारने लावला डोक्याला हात

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदे उतरवणार 'हा' तगडा उमेदवार; राहुल गांधींशी होते साथीदार

Stock Marketमध्ये पैसे बुडाले, वडिलांच्या भीतीने आईसह दोन मुलांचं धक्कादायक कृत्य, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT