A layer of green color has appeared on the water for a distance of two kilometers due to the dumping of chemicals in the Godavari river basin esakal
नाशिक

River Pollution : खेडलेझुंगे येथे गोदापात्रात हिरव्या रंगाचा थर, दुर्गंधी; रासायनिक द्रव्ये टाकल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा

दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा

या रासायानिक द्रव्यांतून उबट वास येत असल्याने ते खूप दिवसांपूर्वीच टाकण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. (River Pollution Green color layer in water tank at Khedlejunge bad smell Suspicion of chemical substances nashik news)

खेडलेझुंगेच्या संतवनासमोर गोदावरी पात्र व साठवण बंधारा आहे. बंधाऱ्यापासून गावाच्या आठवडे बाजारापर्यंत हे रसायनयुक्त पाण्याचे थर दुथडी वाहत आहेत. त्या ठिकाणी सोमठाणे (ता. सिन्नर) येथील नागरिकांसाठी दशक्रिया विधीची जागा आहे.

सोमवारी (ता. १५) सोमठाणे-मेंढी गावातील विवाह संतवनात निसर्गाच्या सान्निध्यात झाला. त्या वेळी अल्हाददायक वाऱ्याची झुळूक व वातावरण असताना रासायनिक द्रव्याची दुर्गंधी परिसरात पसरली.

वऱ्हाडंपैकी अनेकजण नदीपात्राजवळ सेल्फी काढण्यासाठी गेले असताना हा प्रकार दिसला. या ठिकाणी सिन्नर व निफाड तालुक्यांना जोडणारा पूल असून, येथून धुळे बायपासला जाता येते. त्यामुळे हा रहदारीचा रस्ता आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुलावरून नदीपात्रात मध्यभागी रासायनिक द्रव्ये टाकलेले दिसतात. या ठिकाणी यापूर्वीही तीनवेळा असा प्रकार घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. येथे महिला धुणे धुवत असताना दोन दिवसांपासून पाणी हिरवे झाले असल्याचे व त्याची दुर्गंधी सुटल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान, संपूर्ण परिसरात नदीपात्राची पाहणी केली असता, मासेही मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले, तर काही शेतकरी बांधव याच पाण्यात द्राक्षांचे कॅरेट साफ करताना दिसून आले. ही दुर्गंधी आता वाऱ्याच्या झुळकीबरोबर सोमठाणे, सांगवी, चोंढी, मेंढी या सिन्नर तालुक्यांतील गावांतही पसरत आहे.

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनाही या प्रकाराबाबत काहीच माहिती नाही. येथे येणारे मेंढपाळदेखील पाण्याचा रंग पाहूनच दुभत्या जनावरांना पाणी पाजत नाहीत. नाशिकच्या पाटबंधारे खात्यासह जिल्हाधिकारी प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी निफाडसह सिन्नर तालुक्यातील शेतकरी व जलमित्रांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT