Sevakunj Chowk and road in Nimani is in bad condition esakal
नाशिक

Nashik: सेवाकुंज चौकातील रस्त्याची दुरवस्था; अंदाजपत्रकात रस्ते दुरुस्तीकरिता 12 लाख रुपयांच्या निधीची तरतूद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निमाणी ते आडगाव नाका परिसरातील सेवाकुंज येथील चौकातील रस्त्याची गेल्या एक ते दीड वर्षांपासून झालेली दुरवस्था व चौकातील शिल्पनिर्मितच्या कामाबाबत प्रशासनाला वारंवार लक्षात आणून देखील त्याकडे महापालिकेचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी केला आहे. (Road condition in Sevakunj Chowk 12 lakh rupees for road repair in budget Nashik)

अंदाजपत्रकात रस्ते दुरुस्तीकरिता १२ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केलेली असताना देखील आजमितीला महापालिकेकडून कुठलेही काम सुरू करण्याबाबत सकारात्मक हालचाल दिसत नाही.

दरवेळी अधिकारी या ठिकाणी येऊन कामाची पाहणी करून जातात. मात्र नंतर काही होत नाही. यामुळे नागरिकांनी बांधकाम विभागाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

पूर्वी याठिकाणी चांगल्या स्थितीत असलेला रस्ता विविध प्रकारच्या पाइपलाइन, केबल, स्मार्ट व मनपाच्या इतर विभागांमार्फत अनेकदा खोदला गेला. परंतु खोदण्यात आलेले खड्डे व्यवस्थितरीत्या भरले गेले नसल्याने वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागते.

त्यातच अनेकदा छोटे मोठे अपघात घडत आहेत. रस्त्याची दुरवस्था बघता मनपा बांधकाम विभागाकडून तत्काळ या चौकाची व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी एका शाळकरी विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केले होते.

त्यावर पोलिस प्रशासनाने तत्काळ त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुधारावी व भविष्यात अपघात होणार नाही, याकरिता वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली होती. दोन ते तीन महिने तिथे एक-दोन पोलिस कर्मचारी दिसले नंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिका, स्मार्टसिटी कंपनी, पोलिस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या माध्यमातून या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. सद्यःस्थितीत ती बंद आहे.

सिग्नल यंत्रणेवर खर्च करण्यापेक्षा रस्ते दुरुस्तीवर खर्च केला असता तर त्याभागातील अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत झाली असल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखविली आहे.

"माझ्या कार्यकाळात या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता निधीची मागणी केली होती. आमचा कार्यकाळ संपून दीड वर्ष उलटूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेतील एकीकडे उत्पन्न वाढत असले तरी मूलभूत सुविधांकडे प्रशासकीय कार्यकाळात दुर्लक्ष होत आहे."

- हेमंत शेट्टी, माजी नगरसेवक, भाजप

शिल्पनिर्मितीकडे दुर्लक्ष

याठिकाणी नामवंत शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने याठिकाणी चौकात मध्यभागी सर्कलमध्ये ‘आई, एक मुलगा, मुलीला शाळेत सोडत असल्याच्या शिल्पा’ची निर्मिती माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या संकल्पनेतून मंजूर करण्यात आली. मात्र इतक्या वर्षात आजतागायत ते उभे राहू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT