Road network in kalavan Surgana will be expanded soon Nashik News esakal
नाशिक

Nashik | कळवण- सुरगाण्यातील रस्त्यांचे जाळे विस्तारणार

रविंद्र पगार

कळवण (जि. नाशिक) : आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांच्या विशेष प्रयत्नातून कळवण व सुरगाणा या १०० टक्के आदिवासी असलेल्या तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक विस्तारित व अद्यावत करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागाकडून (Department of Tribal Development) ५५ रस्ते, पूल आदी विकासकामांसाठी ८७ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत रस्ते आणि नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. रस्ते विकास ही आर्थिक विकासाची नाळ असल्याने रस्त्यांच्या विकासावर आमदार नितीन पवार सातत्याने भर देत आहे.

कळवण तालुक्यातील मोहबारी ते बरडपाडा, रामा २१ ते लखानी, कोटमबारी ते लोथीबारी, पळसदर ते चिंचपाडा, कुमसाडी- बापखेडा ते धनोली, मोहपाडा ते वडाळे, तताणी ते दळवी वस्ती, खडकी ते निमपाडा, राज्य मार्ग २२ ते वेरुळे रस्ता बांधकाम, बंधारपाडा ते गायकवाडपाडा, बहिरम वस्ती ते देवक्या कुंड ते सिरसा, अभोणा ते वंजारी रस्ता बांधकाम, कळवण खुर्द ते ग्रामीण रस्ता १३६, प्रजिमा ४७ ते कुंडाणे ग्रामा ४५, कळवण खुर्द ते भुसणी, रामा २७ ते मोहनदरी,कळवण खुर्द ते कळवण ग्रामा ६९, इजिमा ९ ते गणोरे, काठरे ते निमपाडा, पाळे ते कळमथे, दह्याणे ते बार्डे या रस्त्यांची प्रामुख्याने सुधारणा होणार आहे.

बरडपाडा ते टाकबारी, निमपाडा ते उंबरदे, प्रजिमा १४५ ते पाटीलपाडा, जुनीबेज ते बिजोरे, विसापूर ते भादवन, मेहदर ते वडाळेवणी, ओझर ते तिऱ्हळ, रामा २२ ते नाकोडे एकलहरे ते महादेव मंदिर शिवरस्ता पुलासह रस्ता, भादवन ते शिवपांधी, प्रजिमा ४७ ते मुंजोबा मोरे वस्ती, प्रजिमा ४७ ते कुंडाणे (ओ) वाघमारे वस्ती, प्रजिमा ४७ ते पाळे कळमथे रस्ता काँक्रिटीकरण, मोहमुखपाडा ते अंबिका ओझर, पिळकोस ते फागदर, वडाळे (हा) ते मोहपाडा, धनोली ते कुमसाडी, कन्हेरवाडी ते ओतूर ग्रामा ३९ बांधकाम करणे, शेरी भैताने ते शिवारपांधी रस्ता आदी रस्त्यांची सुधारणा होणार आहे.

सुरगाणा तालुक्यातील रस्ते व नदीवर पूल होणार असून, त्यात प्रजिमा ६ ते बाळओझर, चिंचपाडा ते कोटमबारी, चिंचपाडा ते रगतविहीर, रामा २२ ते पालविहीर, गोपाळपूर ते पिंपळचोंड रस्ता, इजिमा ८० ते खिराटमाळ रस्ता, गळवड ते शिराषपाडा, रामा २२ ते सतखांब मिलनपाडा, माणी वांगण पुलाचे बांधकाम, आळीवपाडा शिराटा पुलाचे बांधकाम, शिंदे दिगर ते केम डोंगर रस्ता, रामा २२ ते भोये वस्ती रस्ता बांधकाम, घोटूळपाडा ते घोटूळ गाव रस्ता, वाळूट झिराफाटा ते वाळूट झिरा गाव, खोबळा माणी फाटा ते खोबळा गाव आदी रस्त्यांची सुधारणा होणार आहे.

"आदिवासी भागातील रस्त्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडूनही निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्यामुळे कळवण आणि सुरगाणा तालुक्यातील रस्ते विकसित करण्यासाठी शासनस्तरावर प्रास्तवित केलेल्या रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पात ८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात यश आले. दोन्ही तालुक्यात रस्त्यांचे जाळे अधिक विस्तारीत आणि अद्यावत करण्यासाठी आपला प्रयत्न आहे."

- नितीन पवार, आमदार, कळवण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT