Road Construction esakal
नाशिक

Nashik News : ‘मुक्त’ पर्यंत पोचण्याचा मार्ग होणार सुखकर; PWDच्या माध्यमातून होणार रस्‍त्‍याचे काम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर रोडवरील मुख्य रस्‍त्‍यापासून यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठापर्यंत जाणाऱ्या रस्‍त्‍याची चाळण झालेली असताना कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागत होते.

राजकीय उदासीनता व अन्‍य तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्‍या रस्‍त्‍याच्‍या कामाला मुहूर्त लागणार आहे. कामासाठीचा कार्यारंभ आदेश जारी केला असून, लवकरच मुक्‍त विद्यापीठापर्यंत पोचण्याचा मार्ग सुखकर होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली जाते आहे.

राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात विविध कामासाठी राज्‍याच्‍या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. तसेच विद्यापीठ मुख्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही रोज ये-जा करावी लागते. (Road work of ycmou will be done through PWD jalgaon news)

नाशिक शहरातून गंगापूर रोडवरील मुक्‍त विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याच्‍या फाट्यापर्यंत जाण्यास जितका वेळ लागतो, त्‍यापेक्षाही अधिक वेळ फाट्यापासून मुक्‍त विद्यापीठापर्यंत पोचण्यासाठी लागत होता. फाट्यापासून तर विद्यापीठापर्यंत संपूर्ण रस्‍त्‍याची चाळण झालेली असताना, काही ठिकाणी तर थेट तळे साचत होते.

अशात पाण्यातून वाहन काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्‍यामुळे विद्यापीठात कुठल्‍याही मोठ्या समारंभात मान्‍यवर व्‍यक्‍तींना आमंत्रित करताना त्‍यांच्‍या प्रवासाबाबतची चिंता विद्यापीठ प्रशासनाला हैराण करणारी ठरत होती. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी विद्यापीठाकडून यासंदर्भात सातत्‍याने पाठपुरावा सुरू होता. अखेर या कामाला मुहूर्त लागणार आहे.

माजी विद्यार्थी शिंदेंची मदत

रस्‍त्‍याच्‍या दयनीय अवस्‍थेचा विषय थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यापर्यंत पोचला होता. मुख्यमंत्री शिंदे हे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, त्‍यांच्‍या सहाय्यतेतून रस्‍त्‍याच्‍या उभारणीचा तिढा सुटण्यास मदत झालेली असल्‍याचे समजते.

दीड किलोमीटरसाठी थेट शंभर रुपयांची मागणी

रस्‍त्‍याची दुरवस्था पाहता वाहन चालविणे तर दूरच रस्‍त्‍यावर चालणेदेखील मुश्‍कील बनले असल्‍याची स्‍थिती सध्या आहे. अशात विद्यापीठात काही कामासाठी आलेल्‍या बाहेर गावच्‍या विद्यार्थ्यांकडून रिक्षाचालक विद्यापीठ ते गंगापूर रोडला जाणाऱ्या फाट्यापर्यंत अशा साधारणतः दीड ते दोन किलोमीटरच्‍या रस्‍त्‍यासाठी तब्‍बल शंभर रुपये भाडे आकारत आहेत. अंतर कमी असले तरी ते पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ व खराब रस्‍त्‍यामुळे वाहनाचा होणारा घसारा यामुळे जादा भाडे आकारत असल्‍याचे रिक्षाचालकांचे म्‍हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT