Nashik News : आमदार दिलीप बनकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय निफाड मतदारसंघाच्या दृष्टीने फायद्याचा ठरला.
सद्या सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांतर्गत आमदार बनकर यांनी सुचविलेल्या विविध रस्त्यांना, तसेच इतर विकासकामांना सुमारे ६४ कोटी ७९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. (Road works in Niphad taluka are on way 64 crores sanctioned for development Nashik News)
यामध्ये उपजिल्हा रुग्णालय, निफाड येथे ५० खाटांवरून १०० खाटांच्या इमारतीचे बांधकाम करणे ३९ कोटी ८९ लाख, तर कऱ्हाळे, पहिणे, त्र्यंबक, विळवंडी, दिंडोरी, पिंपळगाव (ब.), पालखेड, लासलगाव, मनमाड रस्ता रामा क्र. २९ किमीची सुधारणा करणे चार कोटी. ओझर-सायखेडा- पांचाळे- वावी- कऱ्हाळे- शिर्डी- पुणतांबा रस्ता रामा क्र. ३५ किमीची सुधारणा करणे दोन कोटी ६० लाख.
कऱ्हाळे- पहिणे- त्र्यंबक- विळवंडी- दिंडोरी- पिंपळगाव (ब.)- पालखेड- लासलगाव- मनमाड रस्ता रामा क्र. २९ किमीची सुधारणा करणे तीन कोटी ३० लाख.
कऱ्हाळे- पहिणे- त्र्यंबक- विळवंडी- दिंडोरी- पिंपळगाव (ब.)-पालखेड-लासलगाव-मनमाड रस्ता रामा क्र. २९ मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे एक कोटी ५० लाख. निफाड स्टेशन (कुंदेवाडी) नांदुर्डी- रानवड- खडकजांब- रस्ता प्रजिमा- ६६ किमीची सुधारणा करणे एक कोटी.
ओझर- सुकेणे- पिंपळस कोठुरे रस्ता प्रजिमा-६७ किमीची सुधारणा करणे एक कोटी ४० लाख. ओझर- सुकेणे- पिंपळस- कोठुरे रस्ता प्रजिमा-६७ किमीची सुधारणा करणे एक कोटी ५० लाख. रामा ९५३ (जऊळके वणी)पासून चिंचखेड- आथरे वस्ती -उंबरखेड रस्त प्रजिमा १०९ किमीची सुधारणा करणे एक कोटी ५० लाख.
रामा ९५३ (जऊळके वणी)पासून चिंचखेड- आथरे वस्ती- उंबरखेड रस्त प्रजिमा १०९ किमीची सुधारणा करणे एक कोटी. निफाड स्टेशन (कुंदेवाडी) नांदुर्डी- रानवड- खडकजांब रस्ता प्रजिमा-६६ किमीची सुधारणा करणे दोन कोटी.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रजिमा ४७ कोकणगावपासून सुकेणे- चांदोरी- सायखेडा ते प्रजिमा २७ मार्गे राज्यमार्ग ३५ ला मिळणारा रस्ता प्रजिमा १०७ ची किमीची सुधारणा करणे तीन कोटी. अंतरवेली ते जाधव वस्ती- मुखेड रस्ता किमीची सुधारणा करणे २५ लाख. साकोरे- उंबरखेड ते अंतरवेली रस्ता किमीची सुधारणा करणे २५ लाख.
ओझर (प्रजिमा ३५) ते बाणगंगा नदी (जिव्हाळे) रस्ता किमीची सुधारणा करणे ५० लाख. रामा ३ ते शेजवळवाडी, सोनेवाडी ग्रामा ६७ रस्ता किमीची सुधारणा करणे २५ लाख. चेहंडी ते रामा ३० ते पवार वस्ती रस्ता किमीची सुधारणा करणे २० लाख. तारुखेडले ग्रामा २० ते वडांगळी रस्त्याची सुधारणा करणे २५ लाख.
नारायणटेंभी हरिजन वस्ती ते वडाळी रस्ता किमीची सुधारणा करणे २५ लाख. पंचकेश्वर ते ढोमसे वस्ती रस्ता किमीची सुधारणा करणे २५ लाख. असा एकूण ६४ कोटी ७९ लाख निधी मंजूर झाला आहे.
तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला याबद्दल आमदार दिलीप बनकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नामदार छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, नामदार गिरीश महाजन यांचे निफाड जनतेच्या वतीने आभार मानले
"उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाण्याच्या निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी घेण्यात आला. घेतलेला निर्णय निश्चित सार्थकी लागत असल्याचे दिसून आले. निफाड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ६४ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला व अजूनही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे." -आमदार दिलीप बनकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.