Nashik News : देशातील ईडी, सीबीआय अशा संस्थांच्या माध्यमांतून विरोधकांना नोटिसा बजावून धमकाविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अन नोटिसा बजावलेले हे सत्ताधारी गटात सामील झाले की, स्वच्छ होऊन जातात.
त्यांच्यावरील कारवाई थांबवली जाते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली. (rohini khadse statement of Intimidation of opponents through notices nashik news)
पक्षाला केवळ नेते सोडून गेले आहेत. कार्यकर्त्यांची ताकद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागे भक्कमपणे उभी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक जिल्ह्यात माहिला कार्यकारिणीच्या बैठकीसाठी शनिवारी (ता.२०) राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर रोहिणी खडसे प्रथमच आल्या होत्या. बैठकीनंतर मुंबई नाका येथील पक्ष कार्यालयात खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांना मिळणारा प्रतिसाद संपूर्ण जनता बघत आहे. पक्ष सोडून फक्त काही नेते गेले आहेत, मात्र कार्यकर्ते व पदाधिकारी आजही पवार साहेबांना मानत आहेत. शरद पवार यांनी महिला धोरण आणत त्याची अंमलबजावणी केली. या माध्यमातून महिलांना राजकारणात मोठी संधी मिळाली.
मात्र, गत काही वर्षांत महिलांना कमी संधी मिळत आहे. पक्षातंर्गत महिलांच्या संघटन बांधणीला सुरवात केली आहे. पक्षाने महिला प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिल्याने नाशिकमधील महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांची ओळख व हळद-कुंकूनिमित्त महिलांची भेट घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराबाबत खडसे म्हणाल्या की, प्रभू श्रीराम मंदिराला दर्शन घ्यायला आम्ही नंतर जाणारच आहोत. प्रभू श्रीराम हे फक्त भाजपचे दैवत नाही. आम्हालाही मंदिराचा अभिमान आहे. भाजप मंदिराचा इव्हेंट करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर आरक्षणाला धक्का लागू नये.
वास्तविक पाहता केंद्राला आरक्षण देण्याचा अधिकार असतानाही राज्यातच झुलवत ठेवल्याचा आरोप केला. सरकारने लवकर तो निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेस माजी आमदार दीपिका चव्हाण, जिल्हाध्यक्ष संगीता पाटील, शहराध्यक्ष अनिता दामले, ओबीसी शहराध्यक्ष छबू नागरे, शहर चिटणीस मुन्ना अन्सारी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अॅड. तुषार जाधव, प्रवीण नागरे, करण आरोटे, कविता पवार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.