गणूर : चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी चांदवड गावासाठी पर्यटनाचा प्रारूप आराखडा सादर केला आहे.
स्नेहीत पवार, हर्षल गायकवाड, गौरव ठोंबरे, श्रीकांत देशमुख, निकिता आहेर व साक्षी गलांडे या विद्यार्थ्यांनी हा आराखडा तयार केला आहे. विद्यार्थ्यांना प्रा. एल. बी. पवार व प्रा. ए. के. ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. (rope way Tourism plan presented by students Administration will think positively at chandwad Nashik)
चांदवडला आधीपासूनच पर्यटन, पर्यावरण आणि प्राचीन प्रतिकृती यासाठी ओळखले जाते. यामध्ये श्री अहिल्यादेवी होळकर यांचा रंगमहाल, पूर्वेस रेणुकामाता मंदिर, उत्तरेस इच्छापूर्ती गणेशमंदिर आणि श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर या सर्व पर्यटनास पूरक गोष्टी परिसरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या सर्व गोष्टींचा आधार घेऊन विद्यार्थ्यांनी चांदवडसाठी पर्यटनाचा प्रारूप आराखडा बनवला आहे. या आराखड्यात प्रामुख्याने नैसर्गिक साधनांचा पुरेपूर वापर, पर्यटकांसाठी पोषक वातावरण निर्मिती अशा विविध गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. या आराखड्याचा मुख्य हेतू पर्यटकांसाठी पर्यटन आणि गावकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती हा आहे.
रोपवे, सन सेट पॉइंट, वॉटर राईड, पार्क, बोटिंग हे या आराखड्यातील लक्ष्यवेधी घटक आहेत. या आराखड्यात दोन रोपवेंचा वापर करण्यात येणार आहे. श्री चंद्रेश्वर गडाच्या परिसरात सन सेट पॉइंट बनवण्यात येणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण दोन दिवसांच्या फेरीसाठी बनवला आहे. हा आराखडा नुकताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आसिमा मित्तल, कार्यकारी अभियंता पंकज मेतकर तसेच चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना सादर करण्यात आला.
आराखडा तपासून त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या या दूरदर्शी आराखड्याबाबत संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेश लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, प्रबंध समितीचे सहमानद सचिव व समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व प्रबंध समितीचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.