water supply scheme latest marathi news esakal
नाशिक

Nashik : शहर पाणी पुरवठ्याचा 300 कोटींचा फेरप्रस्ताव

विक्रांत मते

नाशिक : शिंदे सरकारच्या (Shinde Government) पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमृत-२ योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी महापालिकेने (NMC) तीनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता, परंतु निधी संपुष्टात आल्याने प्रस्ताव लालफितीत अडकला होता.

आता निधी उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आल्याने महापालिकेकडून फेरप्रस्ताव सादर केला जाणार आहे. (Rs 300 crore reproposal for city water supply amruti 2 scheme nashik latest marathi news)

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने अमृत-१ योजना केंद्र सरकारने घोषित केली आहे. पाच लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून एकूण योजनेच्या पन्नास टक्के निधी दिला जातो. तर, उर्वरित पन्नास टक्के निधी महापालिकेला खर्च करणे बंधनकारक आहे.

२०१८ मध्ये महापालिकेने अमृत-१ साठी पाणीपुरवठा आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सादर केला होता. २२६ कोटी रुपयांच्या आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मान्य केला. परंतु, गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यात अमृत योजना क्रमांक एकचा निधी संपुष्टात आल्याने पाणी पुरवठा सह मलनिस्सारणाचा प्रस्ताव अडकले होते.

नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे आश्‍वासन देताना अमृत-२ योजनेतून निधी देण्याचे ठोस आश्‍वासन मिळाले होते. आता शिंदे सरकारच्या काळात अमृत-२ ला मंजुरी मिळाल्याने पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय आहे प्रस्तावात?

जुन्या जलवाहिन्या बदलणे, नवनगरामध्ये जलवाहिन्यांचे जाळे विस्तार, नवीन जलकुंभ उभारणे, जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविली जाणार आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी १०० कोटी रुपये, जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी ४२.८४ कोटी रुपये, जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी ५६.७९ कोटी, पाणी मीटर बसविण्यासाठी २५.४७ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे.

फेरप्रस्ताव सादर करताना गावठाण भागात नवीन जलवाहिनी टाकण्याचा समावेश केला जाणार आहे. नाशिक रोड भागासाठी दारणा धरणातून थेट पाणी उचलण्याच्या खर्चाचा समावेश केला जाणार आहे. महापालिकेच्या वाट्याचा खर्च शासनाच्या परवानगीने म्युनिसिपल बॉण्ड किंवा कर्जाच्या माध्यमातून भागविला जाणार आहे.

"अमृत-२ योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना मार्गी लागणार आहे. नवीन सुधारणा करून सुधारित प्रस्ताव लवकरच राज्य शासनाला सादर केला जाईल."

- शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT