RTE admissions esakal
नाशिक

RTE Admission : आरटीई प्रवेशनिश्‍चितीचा 'या' तारखेला मिळेल SMS; जाणून घ्या प्रवेशनिश्‍चितीची मुदत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (RTE) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षासाठीची सोडत बुधवारी (ता. ५) पुणे येथे काढण्यात आली. (rte admission parents will actually receive admission confirmation message on SMS 12th April nashik news)

सोडतीनंतर १२ एप्रिलला दुपारी तीननंतर प्रत्यक्षात पालकांना एसएमएस मिळणार आहेत. त्यानंतर निवड झालेल्या पालकांनी १३ ते २५ एप्रिलदरम्यान कागदपत्रांची छाननी करून प्रवेश निश्चित करून घ्यावे, असे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशाने या राखीव जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

नाशिकमधील ४०१ शाळांत प्रवेशासाठी चार हजार ८५४ जागा उपलब्ध असून, त्यासाठी तब्बल २२ हजार १२२ अर्जांची नोंदणी झाली आहे. १२ एप्रिलला दुपारी तीननंतर २५ टक्के प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना अर्जात नमूद मोबाईलवर एसएमएस पाठविले जातील.

निवडयादीत नावे असलेल्या बालकांच्या पालकांनी १३ ते २५ एप्रिल २०२३ या कालावधीत पंचायत समिती / महापालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.

पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी तारीख ३० एप्रिलपर्यंत शाळेमध्ये जाऊन बालकाचा प्रवेश घ्यावा. ही प्रवेशप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबविली जात असून, प्रवेशप्रक्रियेंतर्गत प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड होणार आहे. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेबाबत पालकांनी कोणतेही दलाल / संस्था यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

SCROLL FOR NEXT