Maharashtra Police  esakal
नाशिक

Nashik Crime News: ग्रामीण पोलिसांचा जिल्ह्यात अवैध धंद्यांना झटका; महिनाभरात 78 लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर पावले टाकत थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. अफू-गांजाची वाहतूक व विक्रीच्या तयारीत असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात केले आहेत. सहा संशयितांना अटक तर, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांच्या आठ पथकांनी गेल्या महिनाभरात जिल्ह्यातून ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, एक कोटी रुपयांचे अवैध बायोडिझेलही जप्त केले आहे. (Rural police crack down on illegal businesses in district 78 lakh worth of goods seized within month Nashik Latest Crime News)

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार पोलिस ठाणेनिहाय निरीक्षकांची पथके व स्थानिक गुन्हे शाखांची पथके रात्रदिवस कार्यरत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे व पथकनिहाय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.

यामुळे ग्रामीण भागात अवैध धंदेचालक, मालकांसहित जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दारूबंदी, जुगार, अवैध वाळू, अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिन्याभरात कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून, महामार्गावरील हॉटेल-ढाबे तपासणीसहित गावस्तरावरील अवैध अड्डे उद्धवस्त करण्यात आले आहेत. अवैध मद्याची वाहतूक, अतिदुर्गम भाग, जुगार-मटाक्याची ठिकाणे व हातभट्ट्यांची गोपनीय माहिती संकलन सुरू आहे.

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

अवैधरित्या मद्याची विक्री व वाहतूक करणारे, हातभट्टीत गावठी दारू तयार करणारे यासह अंक, आकडे, पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळणारे व खेळविणारे यांची धरपकड करण्याचे आदेश अधीक्षक उमाप यांनी दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण पोलिसांची आठ पथके धडाकेबाज कामगिरी करीत कारवाई करीत आहेत.

तक्रारीसाठी हेल्पलाइन

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी हेल्पलाईन क्रमांक सुरू आहे. ६२६२२५६३६३ या हेल्पलाईन क्रमांकावर नागरिक संपर्क साधून अवैध धंद्यांची माहिती देऊ शकणार आहेत. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय राहील असेही आश्‍वासन पोलीस अधीक्षकांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT