वणी : ‘ॐ दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्नो श्रीराम: प्रचोदयात’च्या मंत्राच्या घोषात सप्तशृंगी गडावर श्रीराम मंदिरात पंचदिनात्मक श्रीराम महायागात मंगळवारी (ता. २३) ११ हजार आहुती देण्यात आल्या. (Sacrifice of 11 thousand Shri Ram Gayatri Mantras in Shri Ram Yaga Thousands of devotees bow down at Saptashrungi Fort Nashik)
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर आदिमायेचा शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू आहे. प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी व संतांनी सांगितल्याप्रमाणे ‘हे विश्वची माझे घर’, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थानतर्फे २०१३ पासून दरवर्षी शांकभरी नवरात्रोत्सवादरम्यान दरवर्षी त्रिदिनात्मक किंवा पंचदिनात्मक महायाग होत आहे.
या अगोदरचे सर्व याग देवी मंदिर सभामंडपात झाले. या वर्षी श्रीराम महायाग मंदिर पायऱ्यांवरील राम टप्प्यावरील श्रीराम मंदिरासमोर होत आहे. रविवार (ता. २१)पासून सुरू झालेल्या श्रीराम यागादरम्यान रोज श्रीराम व भगवती मंदिरात विविध फुलांची आरास करण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी देवीची पंचामृत महापूजा, तसेच श्रीराम मंदिरात मूर्ती अभिषेक, श्रीराम याग विधीतील विविध मंडल पूजन, पिठांचा अभिषेक, खीर पोळीचा नैवद्य दाखविण्यात आला.
१०८ श्रीराम सहस्त्रनामावलीचे आचरण, तसेच ११ हजार श्रीराम गायत्री मंत्राची आहुती मुख्य आचार्य सुनील दीक्षित व सहपुरोहितांनी दिली.
मंगळवार देवीचा वार समजला जात असल्याने सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी झाली होती. श्रीराम मंदिर, श्रीराम यागाचे दर्शनासह हजारो भाविक आदिमायेचरणी नतमस्तक झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.