Tribal brothers of the settlement along with cooperation officer Vasant Gawli while worshiping the water of Kupanlake here esakal
नाशिक

Tribal Water Crisis : साधना गवळी यांनी 2 लाख रूपये स्वखर्चातून भागविली आदिवासी बांधवांची तहान!

सकाळ वृत्तसेवा

नरकोळ (जि. नाशिक) : तीनशे लोकसंख्या असलेल्या आदिवासी वस्ती जवळ पाझर तलाव असूनही उन्हाळ्यात पायपीट करत येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत होता.

यावर सहकार अधिकारी साधना गवळी यांनी दोन लाख रुपये खर्चुन वस्तीत कूपनलिका, जलपरी, वीजपंप बसवून येथील महिलांची पायपीट थांबविली आहे. (sadhana gawali paid 2 lakh rupees from his own expenses for Water Crisis of tribal area at narkol nashik news)

ऐतिहासिक मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले श्री सोमेश्वर ३०० लोकसंख्या असलेल्या आदिवासी वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींनी सामना करावा लागत होता.

या वस्तीच्या जवळच पाझर तलाव आहे. पण उन्हाळ्यात या पाझर तलावात पाणी राहत नाही. त्यामुळे तेथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागते. तेथे हातपंप असूनही त्याला देखील उन्हाळ्यात पाणी येत नाही.

ही पाणीटंचाई ओळखून माजी जिल्हा परिषद सदस्या साधना गवळी, सहकार अधिकारी वसंत गवळी या दाम्पत्याने वस्तीवरील महिलांशी संवाद साधत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. दिलेला शब्द पाळतानाच त्यांनी स्वखर्चातून दोन लाख रुपये खर्च करीत कूपनलिका, जलपरी, वीजपंप बसवून पाण्याची सोय केली.

आगामी काळात येथील पाण्याच्या टाकीला तोट्या बसवून पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कुपनलिकेमुळे मुल्हेर किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची देखील उन्हाळ्यात पाण्याची सोय झाली आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

श्रीमती गवळी यांच्या प्रयत्नातून मुल्हेर किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता, विद्युतीकरण अशी कामे झाली. पाठोपाठ कूपनलिका झाल्याने कूपनलिकेला पाणी येताच वस्तीतील आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

सोमेश्वर आदिवासी वस्तीतील महिलांचे पाण्यासाठी हाल पाहिले. बोअरवेल करून पाण्याची समस्या सुटल्याने मनाला आत्मिक समाधान वाटले. पाण्याची टाकीसाठी आता प्रयत्नशील आहे असे श्रीमती गवळी यांनी सांगितले.

यावेळी श्री. गवळी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी काळू महाले, देविदास चौरे, छोटू पवार, ग्रामपंचायत सदस्य उत्तम सोनवणे, त्र्यंबक पवार, आकाश चव्हाण, राजेंद्र गांगुर्डे, रूपेश वालझाडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

"जिल्हा परिषद सदस्या साधना गवळी यांनी आमच्या वस्तीसाठी दिलेला शब्द पाळून पाण्याची सोय करून दिल्याबद्दल आम्ही समाधानी झालो आहोत उन्हाळ्यात आम्हाला पाण्यासाठी मोठ्या संकटाशी सामना करावा लागत होता." - उत्तम सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, मुल्हे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT