Sahastrachandi Mahayaga esakal
नाशिक

Shakambari Navratrotsav : पुरोहितांच्या मंत्रघोषात सहस्त्रचंडी महायागास वणी गडावर प्रारंभ

दिगंबर पाटाेळे

वणी (जि. नाशिक) : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंग गडावर आदिमायेच्या दरबारात शाकंबरी नवरात्रोत्सवा निमित्त आज पुत्रदा एकादशी पासून पुरोहितांच्या मंत्रघोषात, भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पंचदिनात्मक सहस्रचंडी महायाग सोहळयास प्रारंभ झाला. (Sahastrachandi Mahayaga begins at saptashrungi Vani gad with chanting of priests Shakambari Navratrotsav nashik news)

आदिमायेच्या शाकंबरी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत चार महिन्यांपूर्वी संपन्न झालेल्या श्री भगवती मूर्ती / संवर्धन कार्यादरम्यानच्या कालावधीत १ हजार देवी दुर्गा सप्तशती पाठ, देवी अथर्वशीर्ष पाठ, कुंजीका आवारतण, नवार्णव मंत्र संपन्न झाले होते. या अनुष्ठानाची सांगता निमित्त श्री भगवती मंदिरात पंचदिनात्मक सहस्रचंडी महायागास हजारो भाविकांच्या उपस्थित आज उत्साहात प्रारंभ झाला आहे.

शाकंभरी पौर्णिमा (शुक्रवार, ता. ६) या पाच दिवशीय सहस्त्रचंडी महायागा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे. आज ता. ८ सकाळी पुरोहितांना ट्रस्टच्यावतीने वर्धी देवून निमंत्रीत करण्यात आले. यानंतर शिवालय तलावावर प्रायच्चित संकल्प सोडला जावून यजमानांना विडा सुपारी देण्यात आला.

यानंतर आदिमाया मंदिरात गणपती पूजनाने यागाची सुरुवात करण्यात आली. यागाचे यजमान म्हणून सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त भुषणराज तळेकर हे असून यागाचे मुख्य आचार्य मिलिंद राजेंद्र दीक्षित यांच्यासह ३० पुरोहितांच्या मंत्रघोषात यागास प्रारंभ झाला.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

यावेळी पुण्याहवाचन, षोडशमातृका मंडल स्थापन, आयुष्यमंत्र, नांदी श्राद्ध, आचार्यादि वर्णन, वास्तू मंडल स्थापन, योगिनी स्थापन स्थापन, क्षेत्रपाल मंडल स्थापन, प्रधान मंडल स्थापन, नवग्रह मंडल स्थापन, रुद्र मंडल स्थापन, सहस्त्रचंडी मूर्तीनाम प्राण प्रतिष्ठा षोडश ऊपचार पूजन, कुश काण्डिका पूजन, अग्नी स्थापन, नवग्रह यजन स्थापना, देवतांची सांयम पूजन असे आज दिवसभर विविध विधी संपन्न झाल्यानंतर आदिमायेचे सांज दीप आरती संपन्न झाली.

पुढील चारही दिवस दररोज मुख्य दोन सत्रामध्ये महायज्ञ व होम हवन धार्मिक विधी होणार आहे. यात सकाळी ७ ते १ वाजे दरम्यान श्री भगवतीची महापूजा बरोबरच पंचांगकर्म पूजन, देवता स्थापन, अग्निस्थापन, नवग्रह हवन, सहस्रार्चन होणार असून, दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान प्रतिमा प्राण प्रतिष्ठा पूजन, स्थापन, सूर्यादी नवग्रह मंडल देवता होमहवन, सायंपूजन व सांजआरती संपन् होणार आहे.

सहस्त्रचंडी यागासाठी मंदीर सभामंडपात आकर्षक रांगोळी, फुल माळांनी सजविण्यात आला आहे. मूर्ती संवर्धन कार्याच्या सांगता सहस्त्रचंडीयांगाने होत असल्याने व धार्मिकदृष्या महत्त्वपूर्ण असलेल्या या उत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, पुरोहित संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT