CMA Foundation Exam 2023 : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय) यांच्यातर्फे जून-जुलैमध्ये घेतलेल्या फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेतून साई अभंग याने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. नाशिक शाखेचे ६० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. (Sai Abhang 1st in District in CMA Foundation Examination nashik news)
फाउंडेशन परीक्षेच्या निकालात नाशिक चॅप्टरच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत, यावर्षीही घवघवीत यश संपादन केले. परीक्षेला एकूण ११६ विद्यार्थी सामोरे गेले होते. त्यापैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नाशिकमधून साई अभंग याने ३४६ गुण मिळविताना प्रथम क्रमांक पटकावला. सोहम घेगडे याने ३४० गुणांसह द्वितीय, गीतेश शिरूडे याने २९८ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे नाशिक चॅप्टरच्या कार्यकारणीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अध्यक्ष सीएमए आरिफ खान मन्सूरी म्हणाले, वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सीएमए सर्वोत्तम करिअर आहे. विद्यार्थी व्यवसाय व नोकरी या दोन्हीकडे उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे सीएमए करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
सीएमए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर प्रथम फाउंडेशन परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी पुढील इंटरमेडिएट परिक्षेसाठी पात्र होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.