nashik news esakal
नाशिक

Nashik News: सायखेडा पोलिसांतर्फे हळदी कुंकू समारंभात दिला सुवासिंनींचा मान; महिल्या भारावल्या

सागर आहेर ः सकाळ वृत्तसेवा

चांदोरी : आयुष्याचा जोडीदार गेल्यानंतर संसाराचा गाडा एकटीने ओढताना समाजाची साथ मिळावी, तिथे अवहेलना झाली. अमंगळ, अपशकुनाचा भार माथी आला. पतीच्या जाण्याच्या दुःखात रूढी-परंपरांचे ओझे आयुष्यभरासाठी सोबत मिळाले.

अशा लाखो एकल महिलांच्या आयुष्यात आज येतील पोलिस ठाण्याने राबविलेल्या हळदीकुंकूच्या कार्यक्रमाने आनंद फुलला. निमित्त होते रथ सप्तमीनिमित्त आयोजित एकल महिलांच्या हळदी कुंकवाचे.

सायखेडा पोलिस ठाण्यांतर्गत सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या परंपरांना छेद देत मकर संक्रांतीनिमित्त विधवा अन सवाष्ण महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ झाला. विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या या एकल महिलांचा हळदी कुंकवाने मान देऊन सन्मान करण्यात आला.

मकर संक्रांतीनिमित्त समाजामध्ये चांगला संदेश देण्यासाठी जुन्या परंपरेला छेद देत, एकल म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांचा, हळदी कुंकवाचा सुवासिनीचा मान देऊन सन्मान करण्यात आला आहे.

एकल महिलेच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हळदी कुंकूसाठी उपस्थित असलेल्या एकल महिला सन्मानाने भारावून गेल्या होत्या.

श्री.कादरी, महिला पोलिस नाईक उर्मिला काठे, पोलिस नाईक उर्मिला बिष्ट, मीरा दळवी, पोलिस शिपाई अश्विनी वाजे, सुनिता बोडके यांनी सुवासिनी महिलांबरोबर एकल महिलांना सन्मानाने, आत्मविश्वासाने जगता यावे यासाठी रथसप्तमीनिमित्त हळदी कुंकूचे आयोजन केले होते.

'''एकविसाव्या शतकातही जुन्या अरिष्ठ रूढी परंपरा पाळल्या जातात, त्याला छेद देत सायखेडा पोलिस स्टेशनमध्ये एकल महिलांसाठी आयोजित केलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम स्तुत्य आहे.'' - रुपाली चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग.

''अशा प्रकारच्या कार्यक्रमांना समाजमान्यता मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महापुरुषांच्या विचारांनी समाज परिवर्तनाच्या चळवळीला बळ मिळत राहील.'' - श्रीमती निर्मलाताई खर्डे, ज्येष्ठ महिला नागरिक, सायखेडा

ज्येष्ठ महिला नागरिक निर्मलाताई खर्डे, धनश्री वाणी, लता गावले, पुष्पा वाजे, सुनिता नागरे, अलका दराने, ज्योती पवार, अलका सोनवणे, शांता नेहरे, सखूबाई नारायणे, सत्यभामा पानझडे, सुमन पवार, नंदा शिंदे, जिजाबाई खैरनार, नीता गांगुर्डे, शकुंतला राऊत, पुष्पा पवार यासह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT