A little girl who was stunned to take a picture. In the second photograph, the participants of Horizon International School are toddlers. esakal
नाशिक

SAKAL Drawing Competition 2023 : सिडकोत चित्रांच्या दुनियेत रमले बालगोपाल!

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : श्रीमान टी. जे. चव्हाण बिटको माध्यमिक विद्यालयात चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी चित्रकलेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित चित्र काढण्याचा आनंद घेतला.

शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव अहिरे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले तर कलाशिक्षक मोहन भवनसिंग परदेशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली.

"चित्रकला स्पर्धेत सहभाग घेताना मनस्वी आनंद झाला. शाळेत आल्यानंतर चित्रासाठी विषय दिल्याने चित्र काढताना आव्हानात्मक वाटले."- वैभव महाजन, विद्यार्थी

"‘सकाळ’ च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत भाग घेतल्याने खूप छान अनुभव मिळाला. यानंतरदेखील स्पर्धेत नेहमीच सहभाग घेईल."- प्रांजल भारस्कर, विद्यार्थिनी (SAKAL Drawing Competition 2023 children entered world of drawings at cidco nashik news)

हिरे विद्यालय

सावतानगर लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालयात स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांसह पालकही अप्रत्यक्षपणे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असल्याचे बघावयास मिळाले.

शाळेचे मुख्याध्यापक जी. व्ही. शिरसाट, उपमुख्याध्यापक टी. व्ही. मगर यांनी विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. पर्यवेक्षक बी. व्ही. महाले, कलाशिक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.

"चित्रकला हा माझा आवडीचा विषय असून ‘सकाळ’ ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत सहभाग घेताना मनस्वी आनंद झाला आहे. यानंतरही या स्पर्धेमध्ये मी कायम सहभाग घेईलच."
- हर्षदा पाटील, विद्यार्थिनी

"चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेताना मनस्वी आनंद तर झाला, मात्र चित्र रंगविताना झालेली दमछाक हा वेगळाच अनुभव शिकावयास मिळाला."- सार्थक पाटील, विद्यार्थी

पाटील विद्यालय

श्रीमती गुलाबराव पाटील विद्यालय उंटवाडी येथे झालेल्या स्पर्धेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल उंचवण्याकरिता शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी स्वागत फलक तयार केला होता.

तर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सुनील बिरारी, उपमुख्याध्यापक मनोज वाघचौरे यांनीदेखील शुभेच्छा दिल्या. या वेळी पालकदेखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. विद्यार्थी शाळेच्या पटांगणात बसून चित्र काढण्यात व्यस्त झाले होते. चित्रकला शिक्षक सुनील गुळवे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

नवजीवन डे स्कूल

नवजीवन डे स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना चित्र काढताना मनस्वी आनंद होत होता. काही विद्यार्थी गोल करून चित्र काढण्यासाठी बसलेले होते, तर काही विद्यार्थी एका रांगेत. संस्थेचे अध्यक्ष सुभाष बडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मुख्याध्यापक संपत अहिरे, डिंपल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कलाशिक्षिका सविता पाटील यांनी मार्गदर्शन केले.

विखे- पाटील स्कूल

विखे- पाटील मेमोरिअल स्कूल डीजीपीनगर येथे झालेल्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. डॉ. प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा पवार, वर्षा कुंदे, शीतल चौधरी, रंजना मुंढे, मालती देसले यांनी चित्रकला स्पर्धेचे कामकाज बघितले.

तर चित्र काढताना लहान मोठ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनदेखील केले. मुख्याध्यापिका पल्लवी विधाते व शिल्पा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

पवननगर विद्यालय

कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, पवननगर येथे मुख्याध्यापक अप्पासाहेब पवार, युगंधरा देशमुख, पर्यवेक्षक उमेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी काढलेले चित्रे बघून पालकदेखील अवाक झाले. शिक्षक संजय जगताप व संजय कदम यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले.

होरायझन इंटरनॅशनल स्कूल

होरायझन इंटरनॅशनल स्कूल, पाथर्डी फाटा येथे झालेल्या चित्रकला स्पर्धेत शाळेच्या मुख्याध्यापिका रिचा पेकले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने कलाशिक्षक वैशाली पिंगळे यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. विद्यार्थीच नव्हे तर पालकही स्पर्धा सुरू असेपर्यंत शाळेत थांबून आपले पाल्य कसे चित्र काढत आहेत, याकडे लक्ष देऊन होते.

ग्रामोदय विद्यालय

ग्रामोदय विद्यालय, शिवाजी चौक येथे शाळेच्या विश्वस्त योगेश हिरे, महेश हिरे, कृष्णराव मेरे यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्याहळीज, कलाशिक्षक पल्लवी थोरात, संदीप सूर्यवंशी, भावना आहेर यांनी संयोजन केले.

ग्लोबल व्हीजन स्कूल

ग्लोबल व्हीजन इंग्लिश स्कूल, अंबड येथे झालेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनीदेखील सहभाग घेतल्याचे बघावयास मिळाले. शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक सिद्धी अहिरे व रूपाली गायकवाड यांनी संयोजन केले. रविवार असूनही संपूर्ण शाळेतील कर्मचाऱ्यांनी स्पर्धेसाठी योगदान दिले.

विजय इंग्लिश स्कूल

विजय इंग्लिश मीडियम स्कूल, पवननगर येथे चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी थोडा उशीर झालेला बघावयास मिळाला.

मात्र उशीर झाला तरी त्यांना स्पर्धेत सहभागी करून घेतल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील आनंद झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीरेखा नायर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शालिनी बोरसे यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansbha Election : शिंदे सरकारला मोठा झटका! बडा नेता आपल्या पक्षासह महायुतीतून बाहेर; स्वबळावर लढवणार विधानसभा

Ghaziabad News: 10 बायका अन् 6 प्रेयसी, जग्वार कार, विमानानं प्रवास...; 'या' चोराच्या निराळ्या उद्योगांची कहाणी!

IND vs NZ 1st Test : भारत-न्यूझीलंड कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची वेळ बदलली; जाणून घ्या Revised Session Timings

MSP Price for Crops Hikes: मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट; 'या' पिकांच्या 'एमएसपी'मध्ये केली वाढ

Zepto Notification Controversy : झेप्टोने महिलेला पाठवला आय-पिलशी संबंधित आक्षेपार्ह मेसेज; मागावी लागली माफी,नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT