Students participating in the competition at Sant Aisaheb Vidyalaya in Palase esakal
नाशिक

SAKAL Drawing Competition 2023 : रंगरेषांच्या अनोख्या दुनियेची अदभुत सफर

सकाळ वृत्तसेवा

नाशिकरोड : ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेत नाशिक रोड, जेलरोड, उपनगर, पळसे, एकलहरे, एकलहरे रोड केंद्रावर चारही गटात विद्यार्थी, विद्यार्थिनींनी रंगरेषांच्या अनोख्या दुनियेची अदभुत सफर अनुभवली.

रंगाची उधळण करत बालगोपाळांनी थंडीतही आपल्या हातातील रंगाच्या ब्रशने चित्रांना जणूकाही मुर्तरूप दिले होते. या सफरीत सहभागी पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा मनोमन दावा होता, मीच होणार या स्पर्धेचा मानकरी. (SAKAL Drawing Competition 2023 wonderful journey into unique world of color lines childrens nashik news)

हक्काचे व्यासपीठ म्हणून पालक या स्पर्धेची दरवर्षी वाट पाहतात. त्याहूनही अधिक ही उत्सुकता मुलांना असते. स्पर्धा सुरू होण्याच्या वेळी आधीच मुले स्पर्धा केंद्रावर दाखल झालेली होती. चित्र काढण्यासाठी कागद व प्रश्‍नपत्रिका हातात पडताच मुलांनी काही वेळ अंतर्मनाला साद घालत विषयांची निवड केली.

यानंतर लगबगीने चित्र काढण्याकडे मोर्चा वळवत रेखाटणास सुरवात केली. जो तो संबंधित विषयाला धरुन आपल्या डोळ्यासमोर निर्माण झालेल्या कल्पनेला प्रथम पेन्सिलच्या माध्यमाने कागदावर उतरवत होता. सुबक रेखाटणाच्या निमिर्तीनंतर चित्र काढण्याच्या प्रक्रियेतील सर्वात आवडीचा भाग असणाऱ्या रंगोटीला सुरवात झाली.

हळूहळू बालगोपाळांच्या मनातील कलाकृती कागदावरच रंग घेत होती. कागदावर साकारलेली रंगबिरंगी विचार चित्रांच्या माध्यमातून तेथे प्रत्यक्ष प्रकट झाल्याचा भास होत होता. अनोख्या विश्‍वात विचार, कलाकृती, रंग, चित्रे, भावना, आनंद आदींचा सप्तरंगी वास सभोवताली होता. अद्वितीय आनंदात मुले हरवली होती.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

कोरोनामुळे दोन वर्ष शिक्षण ऑनलाइन झाले आता शाळेत मुले येवू लागल्याने पालकांमध्ये आनंदोत्सव होता. एकलहरे रोड येथील साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये योगेश गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंजली घोलप, कल्याणी निकम, सुरती पारचा, मीनाक्षी अंजोळे, सौरभ आभाळे यांनी सहकार्य केले.

पळसे येथील संत आईसाहेब विद्यालयात मुख्याध्यापिका आशा गाडे, मुख्याध्यापक संजय बोरसे, मधुकर संधान, आशीर्वाद गायखे, समाधान गायखे, श्याम साबळे, कला शिक्षक बी. के. जाधव व ज्ञानेश्वर गायधनी आदी उपस्थित होते.

"चित्रकला स्पर्धेमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला असून, त्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंद मिळाला." - अर्चना धने, पालक

"ऑफलाइन चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंद असून, स्पर्धा आयोजित केल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार." - अथर्व घायवटे, विद्यार्थी

"शाळांमुळे सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी होता आले, याचा मला आनंद वाटतो."
- आयर्न बेलदार (विद्यार्थी )

"कोरोनानंतर ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आनंद मिळाला."

- आयुष हांडगे, विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansbha Election : शिंदे सरकारला मोठा झटका! बडा नेता आपल्या पक्षासह महायुतीतून बाहेर; स्वबळावर लढवणार विधानसभा

Ghaziabad News: 10 बायका अन् 6 प्रेयसी, जग्वार कार, विमानानं प्रवास...; 'या' चोराच्या निराळ्या उद्योगांची कहाणी!

IND vs NZ 1st Test : भारत-न्यूझीलंड कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची वेळ बदलली; जाणून घ्या Revised Session Timings

MSP Price for Crops Hikes: मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट; 'या' पिकांच्या 'एमएसपी'मध्ये केली वाढ

Zepto Notification Controversy : झेप्टोने महिलेला पाठवला आय-पिलशी संबंधित आक्षेपार्ह मेसेज; मागावी लागली माफी,नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT