Jal Jeevan Mission  esakal
नाशिक

SAKAL Exclusive : जलजीवनच्या 125 कामांना मिळेना मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जलजीवन मिशनअंतर्गत कामे सुरू करण्यासाठी गत तीन महिन्यांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. असे असतानाही, जिल्ह्यातील १२५ कामांना अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. यात प्रामुख्याने सुरगाण्यातील २३, तर पेठ तालुक्यातील २१ कामांचा समावेश आहे.

प्रस्तावित केलेल्या एक हजार २२२ योजनांपैकी आतापर्यंत केवळ ५७ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२४ अखेर सर्व योजना पूर्ण करण्याचे आदेश आहेत. परंतु अद्याप कामांनाच सुरवात नसल्याने योजना कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (SAKAL Exclusive 125 works of Jal jeevan scheme not started yet nashik news)

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या एक हजार २२२ योजनांना कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया संपून तब्बल तीन महिना उलटूनही अद्याप १२५ कामांना प्रत्यक्ष सुरवात झालेली नाही. अनेक गावांच्या पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनेचा आराखडा नसल्यामुळे ग्रामपंचायतींनी तक्रारी केल्या आहेत.

प्रामुख्याने चांदवड, सुरगाणा, पेठ, कळवण आदी तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे आराखडे चुकीच्या असल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. या तक्रारींचे निराकरण झाल्याशिवाय काम सुरू होऊ न देण्याची भूमिका त्या गावांनी घेतली आहे. आतापर्यंत पाणीपुरवठा योजनांसाठी जलस्वराज्य, भारत निर्माण, मुख्यमंत्री पेयजल आदी योजना राबविल्या गेल्या.

मात्र, या योजना केवळ तयार झाल्या; पण त्यांचा प्रत्यक्ष काहीही फायदा झाला नाही. आता जलजीवनमधून एक हजार ४४३ कोटींच्या योजना जिल्हा परिषद राबवत असून, त्या योजना अपयशी ठरल्यानंतर सरकार पुन्हा निधी देणार नाही. ही गावे तशीच तहानलेली राहतील, अशी ग्रामपंचायतींची भूमिका आहे.

यामुळे तक्रारी असलेल्या १२५ गावांचे सरपंच, ग्रामसेवक, संबंधित ठेकेदार यांच्यासह तालुकानिहाय पंचायत समित्यांमध्ये बैठका घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता. मात्र, या बैठकांना प्रशासनाकडून मुहूर्त मिळालेला नाही. या योजना पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. यामुळे तोपर्यंत योजना पूर्ण करण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषद प्रशासन व ठेकेदार यांच्यासमोर आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

तालुका मंजूर योजना प्रगतीतील कामे कामांना अद्यापही सुरवात नाही

बागलाण--------११२---------------१०७------------- १

चांदवड-----------७४-------- ५२----------- १६

देवळा------------३३------- २५------------- ०४

दिंडोरी----------१०४---------- ९४------------ ०६

इगतपुरी-----------९१-------- ९०--------------- --

कळवण---------१२७----------- १०६----------- १२

मालेगाव-----------५५----------- ४२----------- ०९

नाशिक------------५५------------------५०--------- ०४

नांदगाव------------२६------------------२०----------- ०३

निफाड-------------९५----------- ७६------- ०८

पेठ-----------------८५----------- ६४ -------------- २१

सिन्नर----------------८०-----------------७३---------- ०७

सुरगाणा------------१६४----------------१३३-------- २३

त्र्यंबकेश्वर------------८५---------------- ७६---------- ०९

येवला---------------३६------------------३२-----------------------०२

थेट आराखडे मंजुरीने अडचणी

जलजीवन मिशनमधील पाणीपुरवठा योजनांना २०२१-२२ या वर्षात प्रशासकीय मान्यता देताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने गावाची गरज, तेथील सध्याची व्यवस्था, नवीन योजनेतून उभारण्यात येणारी कामे, त्यासाठी जागेची उपलब्धता याबाबींची काळजी घेतली नाही.

त्याचा फटका आता जलजीवन मिशनमधील कामे सुरू करताना ठेकेदारांना बसत आहे. अनेक गावांच्या पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनेचा आराखडा नसल्यामुळे ग्रामपंचायतींनी तक्रारी केल्या आहेत. या योजना मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, ठेकेदार यांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

ठेकेदारांकडून थेट आराखडे मंजूर झाल्याने योजनांना अडचणी येत आहेत. त्यामुळे पुन्हा गावपातळीवर जाऊन बैठका घेऊन योजना मार्गी लावण्याची नामुष्की प्रशासनावर ओढविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT