Sakal Exclusive esakal
नाशिक

SAKAL Exclusive: उद्योगांसाठी वाडीवऱ्हे भागात 200 एकर जमीन; गोंदे वसाहतीला लागूनच औद्योगिक विकासाचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात औद्योगिक वसाहतीसाठी अतिरिक्त जमिनीचे भूसंपादन करण्यावरून पांजरपोळच्या गायरान जमिनीवरून मतभेद चव्हाट्यावर येत असताना प्रशासनातर्फे मात्र वाडीवऱ्हे ते राजूर बहुला दरम्यान साधारण दोनशे एकर जमीन संपादित करण्याचे नियोजन सुरू आहे. (SAKAL Exclusive 200 Acres of land in Wadiwharhe area for industries Planning of industrial development adjacent to Gonde Colony nashik news)

राज्यात सध्या नवीन औद्योगिक प्रकल्पांसाठी जागांचा विषय सगळीकडे चर्चेत आहे. नाशिकही याला अपवाद नाही. नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जागा संपादनाची मागणी होत असताना दुसरीकडे गायरानाची जागा देण्यास विरोध सुरू झाला आहे. अशा विरोधी वातावरणामुळे नाशिकला औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन हा कुतूहलाचा विषय झाला आहे.

आहे त्या जागांचा प्रश्न

सिन्नरला इंडिया बूलच्या सुमारे १२०० हेक्टर जागेवर उद्योग आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत उद्योग नाही. सातपूर औद्योगिक वसाहतीत मोठ्या उद्योगांसाठीच्या राखीव प्लॉटचे तुकडे पाडून उद्योगापेक्षा जमिनीच्या खरेदी -विक्रीत जास्त उखळ पांढरे करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उद्योजकांच्या संघटनेने केला.

नाशिकच्या विकासासाठी औद्योगिक क्षेत्र कमी पडत असल्याचा प्रचार करीत त्यासाठी जागेची मागणी सुरु आहे. त्यासाठी जंगल वनसंपदा असलेल्या जागाही संपादित करण्यासाठी आग्रह धरला जात आहे.

अमूक हेक्टर तमूक हेक्टर जागा लागणार अशी मागणी होताना त्यातून नेमके किती वर्ष आणि किती रोजगार मिळणार हे सांगायची तसदी मात्र कुणीही घेत नाही. अशा परस्परविरोधी दोन टोकाच्या भूमिकांमुळे ढवळून निघालेल्या वातावरणात शासनाच्या भूसंपादनाच्या निर्णयाकडे सगळ्याचेच लक्ष लागून आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

वाडीवऱ्हे- राजूर बहुला संपादन

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जिल्ह्यात पाच ठिकाणी जागा घेण्याचे नियोजन आहे. त्यापैकी राजूर बहूला ते वाडीवऱ्हे दरम्यान भूसंपादनाची प्रक्रिया महिनाभरात अधिसूचना निघण्याची चिन्हे आहेत. या शिवाय दिंडोरी, सिन्नर, मनमाड आणि राजूरबहुला आदी ठिकाणी भूसंपादनाचे नियोजन सुरू आहे.

त्यात, राजूरबहुला वाडीवऱ्हे दरम्यान पुढील भूसंपादनाला प्रशासन अनुकूल असून साधारण पुढील महिन्यात अधिसूचना निघण्याची चिन्हे आहेत. मात्र, याशिवाय आता स्थानिक पातळीवर निर्णयाऐवजी थेट मंत्रालयातून हिरवा कंदील मिळवून आणत गतिमान दाखविण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ आहे. सोबत आगामी निवडणुकांच्या तोंडावर सोयीचे निर्णयही पदरात पाडून घेता येत असल्याने आगामी काळात भूसंपादन प्रक्रियेला गती येण्याची चिन्हे आहेत.

प्रस्‍तावित भूसंपादन
राजूरबहुला- वाडीवऱ्हे - १४४.४३ हेक्टर

"वाडीवऱ्हे राजूर बहुला शिवारात औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादनाचे नियोजन आहे. शेजारीच गोंदे औद्योगिक वसाहत आहे. त्यालगतच वाडीवऱ्हे ते राजूरबहुला दरम्यान जमिनीचे नियोजन सुरु आहे. लवकरच हा विषय मार्गी लागले." - गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT