जुने नाशिक : एकावेळी एकाच पोलिस ठाण्याकडून २१ संशयितांना तडीपार करण्याची शहरातील गेल्या काही वर्षातील पहिलीच कारवाई आहे. भद्रकाली पोलिस ठाणे अशा प्रकारच्या कारवाईतील पहिले पोलिस ठाणे ठरले आहे. (SAKAL Exclusive 21 suspects arrested from same police station at same time nashik crime news)
काही महिन्यांपूर्वी गंजमाळ परिसरात दोन गटांकडून एकमेकांवर दगडफेक करत दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला होता. काही वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पोलिस थोडक्यात बचावले होते. अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणले होते. संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचे समोर आले होते.
अशा प्रकारची संघटित गुन्हेगारी की ज्यामुळे समाजात दंगलीसारखी परिस्थिती निर्माण होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. भविष्यात पुन्हा उफाळून येऊ नये, संघटित गुन्हेगारीवर आळा बसावा, यासाठी भद्रकाली पोलिस ठाणेतर्फे उपायुक्तांकडे गंजमाळ दंगल प्रकरणातील तसेच अन्य विविध गुन्ह्यातील संशयितांचा तडीपारीसाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
त्यास मंजुरी मिळाली आहे. सुमारे २१ संशयितांचे तडीपारांचे आदेश भद्रकाली पोलिस ठाण्यास प्राप्त झाले आहे. त्यातील १८ संशयित गंजमाळ दंगल प्रकरणातील आहे. त्यात पंचशीलनगर येथील १०, तर सहकारनगर आणि भिमवाडी येथील ८ जणांचा समावेश आहे.
यांना एक वर्षासाठी शहर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अन्य तिघे विविध गुन्ह्यातील संशयित आहे. त्यातील एकास एक वर्षासाठी तर अन्य दोघांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. यात दोन्ही गटात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
असे आहे तडीपार
पंचशीलनगर : अरबाज ऊर्फ सोनू रफिक बेग, शाहरुख फारुक शेख, साहिल फारुख शेख, अक्रम बाबर खान, अरबाज नासिर बागवान, जावेद खुर्शिद शेख, आसिफ रऊफ शेख, शाहीद अयास शेख, राजू अल्ताफ शेख, साहिल ऊर्फ अप्पू अयाज शेख.
सहकारनगर भिमवाडी : संदीप गुलाब गाडेकर, गणेश चंद्रकांत मोरे, अनुराग उत्तम सहेजराव, रोहित छबूराव डोके, प्रदीप खंडू वाहुळे, भीमा मुकेश पाथरे, आझाद मुकेश पाथरे, आकाश रमेश सोनवणे, निखिल विनोद कंडारे, सादिक हनीफ शेख, पांडुरंग ऊर्फ पांड्या हनुमान शिंगाडे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.