ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

SAKAL Exclusive: कोणी अधिकारी देता का! अधिकारी! शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला मिळेना कारभारी

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

SAKAL Exclusive : जिल्हा परिषदेत सव्वावर्षापासून प्रशासक राजवट असतानाही अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून, महत्त्वाच्या आरोग्य, प्राथमिक शिक्षण, जलसंधारण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा कारभार प्रभारीवरच आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

विशेष म्हणजे तब्बल गत सात महिन्यांपासून आरोग्य विभागाला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने विभाग वाऱ्यावर आहे. या शिवाय प्राथमिक शिक्षण विभागास देखील वर्षभरापासून अधिकारीच मिळालेला नाही. (SAKAL Exclusive Education health rural water supply department did not get officer nashik zp news)

जिल्हा परिषदेत १५ हून अधिक विभाग आहेत. या विभागासाठी स्वतंत्र अधिकारी आहेत. पण, नाशिक जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका अधिकाऱ्याकडे दुसऱ्या विभागाचा पदभार दिला गेला आहे.

यामुळे अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी असणारे डॉ. कपिल आहेर यांची आरोग्य उपसंचालकपदी पदोन्नती झाली. त्यांनी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी पदभार सोडला.

त्यामुळे रिक्तपदाचा पदभार हा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांच्याकडे सोपविला. मवाळ स्वभाव असलेल्या डॉ. नेहते यांच्याकडून आरोग्याची धुरा सांभाळताना मोठी कसरत होत आहे.

अंजनेरी, चांदोरी सारख्या घटनांमधून आरोग्य केंद्रातील कामकाजाचे वाभाडे निघत असून, विभागाच्या बदल्यांमध्ये सावळागोंधळ झाला. वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करून रातोरात झालेल्या बदल्यांही वादात सापडल्याअसून त्याची चौकशी सुरू आहे.

दिशा समितीच्या बैठकीतच तर, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आरोग्याचा पंचनामा केला. त्यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी डॉ. नेहते यांचा पदभार काढून घेण्याची तयारी केली होती.

मात्र, पुन्हा हा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला. प्राथमिक शिक्षण विभागास तर, वर्षभरापासून प्रभारीवर कारभार सुरू आहे. शिक्षणाधिकारी राजीव म्हस्कर ३० जून २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा पदभार तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्याकडे दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, त्यांच्या कामकाजावरून कदम यांच्याकडून पदभार काढून दिंडोरीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्याकडे सोपविला. २९ डिसेंबर २०२२ रोजी शिक्षणाधिकारी (योजना) येथे भगवान फुलारी यांची नियुक्ती झाली.

त्यानंतर, फुलारी यांच्याकडे शिक्षणाधिकारीपदाचा पदभार सोपविला. गत आठवड्यापासून ते रजेवर गेलेले असल्याने पुन्हा कनोज यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.

या विभागांपाठोपाठ महत्त्वाचा समजला जाणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला देखील तीन महिन्यांपासून अधिकारी मिळालेला नाही. विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर यांची फेब्रुवारी २०२३ रोजी विनंती बदली झाली.

त्यानंतर या विभागाचा पदभार मालेगावचे उपअभियंता अनिल महाजन यांच्याकडे देण्यात आला. मात्र, तडकाफडकी त्यांच्याकडून पदभार काढून तो बांधकामचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्याकडे देण्यात आला आहे.

दोन विभागाचा कारभारामुळे सोनवणे यांची कसरत होत असल्याने, जलजीवन मिशनच्या कामांची ओरड सुरू आहे. जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार ३१ मार्च २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार हा उपअभियंता कापडणीस यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT