A semi-enclosed facility for goat rearing. esakal
नाशिक

SAKAL Exclusive : शेळी हेच आमचे पीक, तेच आमचे एटीएम! एकनाथ हगवणे यांनी शेळीपालनातून गाठला नवा पल्ला

सकाळ वृत्तसेवा

विकास गीते : सकाळ वृत्तसेवा

SAKAL Exclusive : कोणतेही काम हे छोटे नसते कामातूनच आपली ओळख होते. अशा या वाक्यातून एकच बोध घेऊन ५० वर्षांपासून अर्ध बंदिस्त पद्धतीने शेळीपालन व्यवसाय करून घोरवड येथील एकनाथ हगवणे यांनी शेळी व्यवसायातून समाजात सन्मान मिळवला आहे.

शेळी हेच आमचे पीक आणि तेच आमचे एटीएम असे त्यांच्या कन्या वनिता बरे या आवर्जून सांगतात. एकनाथ हगवणे यांनी शंभर शेळ्यांचे पालन त्यांनी केले असून दूध विक्री तसेच, लेंडी खतातून त्यांनी आतापर्यंत चांगले उत्पन्न घेतले आहे.

शेळी व्यवसायातून काय साध्य होऊ शकते हे हगवणे यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे सर्वांना दाखवले आहे. (SAKAL Exclusive Eknath Hagwane reached new level in goat farming nashik news)

एकनाथ हगवणे यांना वडिलोपार्जित सहा एकर जमीन वाट्याला आली. मात्र ती कोरडवाहू असल्याने या क्षेत्रावर फक्त जनावरे चरायचे. त्यावेळी ५० वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीत रोजगाराचा सक्षम पर्याय नसल्याने मोलमजुरी करून त्यांनी उदरनिर्वाह करायचे.

आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने जगण्याचे साधन म्हणून १९७३ ला ५५ रुपयाला एक शेळी विकत घेतली. पुढे दुसरी, तिसरी अशा आज शंभर शेळ्या त्यांच्याकडे आहेत.

शेळीपालनाने कुटुंबाची प्रगती

एकनाथ यांनी वयाच्या २५ व्या वर्षी शेळीपालन व्यवसाय सुरू केला. त्यावेळी गरिबी असताना याच व्यवसायातून त्यांना साथ मिळत गेली. सकाळी शेळ्या सोडायच्या आणि गावाजवळ पडीक माळरानावर किंवा डोंगर परिसरात शेळ्या चारण्यासाठी न्यायचा असा अर्धबंदिस्त पद्धतीचा हा व्यवसाय होता.

आज ७५ वर्षांचे वय असतानाही या व्यवसायत ते आजही कार्यरत आहेत. कष्ट आणि व्यवसायात सातत्य ठेवल्यानेच त्यांच्या जीवनात परिवर्तन घडले. या कुटुंबाने पुढे मुरमाड जमिनीचे पुनर्भरण करून शेती विकसित केली.

आज त्यावरच विविध पिकांसह चारापिके ते घेत आहेत. शेतीचा विकास करण्यासाठी ट्रॅक्टरसह यांत्रिकीकरण खरेदी केले आहे. पत्नी राहीबाई, मुलगा मच्छिंद्र, मुलगी वनिता कामकाज पाहतात.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

एकावरून आता शंभर शेळ्या

शेतीत शाश्वत उत्पन्न नसल्याने शेळीपालन सरकार पूरक व्यवसाय मोठा आधारभूत ठरला आहे. पन्नास वर्षांपूर्वी सुरवात झाली तेव्हा अवघी १ शेळी होती, तर आज शंभर शेळ्या त्यांच्याकडे आहेत. सुरवातीला संगमनेरी जातीच्या शेळ्या होत्या.

तर गेल्या चार वर्षांपूर्वी शिरोही व काठीयावाडी जातीच्या शेळ्यांचे पालन ते करत आहेत. याशिवाय गाय, म्हैस यांचे पालनही ते करतात.

बारकावे समजून घेत आव्हाने कमी

व्यावसायिक शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतल्याने आता शेळ्यांचे संगोपन, निगा, दूधसंकलन त्या करतात. शेळ्या, बकरे विक्रीसाठी खरेदी विक्री व्यवस्था उभी केली. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता आली. नगाप्रमाणे होणारा व्यवहार आता न होता वजनाप्रमाने केला जातो.

बारकावे समजून घेत आव्हाने कमी झाल्याने आर्थिक लाभ या कुटुंबाला होत आहे. युवा मित्र संस्था खरेदी करू लागल्यानंतर ४२ रुपये प्रती लिटर दर मिळतो. वनिता यांनी महिला उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत स्पर्धेत ‘उत्कृष्ट शेळी पुरस्कार’ पुरस्कार मिळाला आहे. यासह पशुसंवर्धन विभागातर्फे कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत दुग्ध स्पर्धेत सन्मान झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT