Drama File Photo esakal
नाशिक

SAKAL Exclusive: प्रायोगिक नाटकांवर महिला विषयांची छाप! नाट्य संस्थांकडून नवनवीन, हटके प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Exclusive : व्यावसायिक नाटकांच्या जोडीला आता प्रायोगिक नाटकांच्या प्रयोगांची संख्या वाढली आहे. व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकांची गणितं वेगळी असतात. तिथे प्रेक्षकांना काय रुचेल, आवडेल याचा प्राधान्याने विचार केला जातो.

तर हौशी तथा प्रायोगिक रंगभूमीवर सातत्याने काहीतरी नवनवीन, हटके प्रयोग केले जात असतात. त्यात महिला विषयांचीच छाप पडल्याचे दिसत आहे.

नाट्य संस्था महिलांचेच विषय हाताळत असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. (SAKAL Exclusive Female Subjects Imprint on Experimental Dramas Innovative radical experiments by theater institutions Nashik news)

नाशिकमध्ये राज्य नाट्य स्पर्धेतील प्रयोग वगळता प्रायोगिक नाटकांचे सहा प्रयोग २०२३ मध्ये झाले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात प्रायोगिक नाटकांसह बाल नाटकांची संख्याही कमी होती. प्रायोगिक नाट्यनिर्मिती करणाऱ्या नाट्यसंस्था ठिकठिकाणी नाटकांचे प्रयोग करतात.

मुळात प्रायोगिक नाटके करण्यासाठी नाशिकमधील संस्था वगळता मुंबई व पुणे येथील नाटक संस्था परवडत नसल्याने नाटक करत नाही. त्यामुळे नाटकांची संख्या कमी आहे.

प्रायोगिक नाटकांचा प्रयोगांची संख्या कमी असल्याने राज्यातील नाट्य संस्थांना नाशिक आर्थिक अडचणीचे ठरत असल्याचे दिसत आहे. नाशिकच्या नाट्यसंस्थांनी नवीन नाटके रंगभूमीवर आणली आहेत. नव्या नाटकांच्या प्रयोगांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बाई जरा कळ काढा, अ फेअर डील या सारख्या कलाकृती महिला व पती - पती यांच्यातील नाते संबंधावर आधारित होत्या. या मधून गर्भपात, बलात्कार या सारख्या मुद्यांना देखील स्पर्श करण्यात आला.

तर इश्क का परछा सारख्या नाटकातून तरुणाईच्या जिव्हाळ्याचा उमलत्या वयातील प्रेम हा विषय परिणामकारकपणे सादर केला गेला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या नाटकांचे झाले प्रयोग

दोन ते तीन वर्षे प्रायोगिक नाटकांचे प्रयोग झाले नाही. गत काही महिन्यांत नाट्यसंस्थांकडून राशोमान, वाफाळलेले दिवस, इश्क का प्रचार, नात्याची गोष्ट, फेअर डील, बाई जरा कळ काढा अशा सहा नाटकांचे प्रयोग झाले आहे.

नाशिकमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत एप्रिल-मे महिन्यात फक्त दोनच बालनाटकांचे प्रयोग झाले आहेत. त्यात झुंजार, ढूंमूकपूरचा राजा यांचा समावेश आहे. या दोन नाटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

"पुणे, मुंबई येथील संस्थांना नाशिकमध्ये प्रायोगिक नाटके करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने तेथील नाट्यसंस्थांचे प्रयोग होत नाही. नाशिकमधील नाट्य संस्थाच हौशी किंवा प्रायोगिक नाटके करीत आहे."- आनंद जाधव, रंगकर्मी

"प्रायोगिक रंगभूमीवर वैविध्यपूर्ण विषय हाताळले गेले आहे. त्यात महिलांसह पती-पत्नी यांच्यातील हळुवार, संवेदनशील नातं असो की मग मानसिक आरोग्याचा प्रश्न तो तितक्याच समर्थपणे मांडला गेल्याचे दिसून येते." -श्रीराम वाघमारे, रंगकर्मी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT