Lawyer Profession esakal
नाशिक

SAKAL Exclusive : तरुणाईला भावतोय ‘वकिली’चा पेशा!

अरुण मलाणी

नाशिक : ‘वकिलांना बँकवाले कर्ज देत नाहीत..,’ ‘विवाहेच्छू मुलगा-मुलगी वकील आहे का? मग विचार करावा लागेल’ असे वाक्‍य अनेक वेळा ऐकायला मिळाले असतील. दुसरीकडे करिअरसाठी वकिली व्‍यवसायाकडे तरुणाई वळत असल्‍याची सध्याची स्‍थिती आहे. विधी शाखेतील एलएलबी अभ्यासक्रमाला राज्‍यात उपलब्‍ध ३० हजार ३०८ जागांपैकी तब्‍बल २७ हजार २८६ जागांवर यंदा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे तरुणाईला वकिली पेशा भावत असल्‍याचे चित्र निर्माण झाले आहे. (SAKAL Exclusive increasing Young people choosing profession of lawyer nashik news)

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता एलएलबी (तीन वर्षे) आणि बी. ए. एलएलबी (पाच वर्षे) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे. राज्‍यभरातील सर्व विद्यापीठांमध्ये उपलब्‍ध असलेल्‍या विधी शाखेच्‍या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासंदर्भातील माहितीचा आढावा घेतला असता गतवर्षीच्‍या तुलनेत प्रवेशीत विद्यार्थ्यांच्‍या संख्येत वाढ झाली असल्‍याचे समोर आले आहे. त्यामुळे वकिली पेशात करिअर करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला असल्‍याचे बोलले जात आहे.

कट-ऑफ वाढला, प्रवेशापासून मुकले विद्यार्थी

गत शैक्षणिक वर्षाच्‍या तुलनेत यंदा एलएलबी प्रवेशासाठी कट-ऑफमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे प्रवेशाच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागल्‍याची माहिती समोर येते आहे. गत शैक्षणिक वर्षाच्‍या तुलनेत जागांमध्ये वाढ करूनही प्रवेश रिक्‍त जागांचे प्रमाण घटलेले आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

तीन हजार जागा रिक्‍त

प्रवेशप्रक्रिया पूर्ण होत असताना यंदाच्‍या वर्षी अवघ्या तीन हजार २२ जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत. यापैकी एलएलबी (तीन वर्षे) अभ्यासक्रमाच्‍या ३७२ जागा तर एलएलबी (पाच वर्षे) अभ्यासक्रमाच्‍या दोन हजार ६५० जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत. तुलनेत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये एलएलबी (तीन वर्षे) च्‍या २७२ आणि एलएलबी (पाच वर्षे) च्‍या दोन हजार ९१६ अशा एकूण तीन हजार १८८ जागा रिक्‍त राहिल्‍या होत्‍या.

राज्‍यातील प्रवेशाची स्‍थिती अशी

एलएलबी (तीन वर्षे)

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ शैक्षणिक वर्ष २०२२-२३

प्रवेश क्षमता झालेले प्रवेश प्रवेश क्षमता झालेले प्रवेश

१७,६०४ १७,३३२ १८,४२५ १८,०५३

एलएलबी (पाच वर्षे)

११,७५५ ८,८३९ ११,८८३ ९,२३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT