Books esakal
नाशिक

SAKAL Exclusive: 'वाचन' चळवळीसाठी ग्रंथालय, वाचनालयांना मिळावे बळ! वाढती महागाई, खर्च पाहता तुटपुंज्या अनुदानामुळे घरघर

यामुळे नव्या वर्षात शासनाकडून वाचनालयांना आर्थिक बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर : शासन वाचन चळवळीचा प्रचार व प्रसाराबाबत अनेक वाचनालयांना अनेक उपक्रम सुचवीत असले, तरी त्यांच्या समस्यांकडे गंभीरपणे बघत नसल्याने ग्रामीण भागात वाचन चळवळ मंदावली आहे.

यामुळे नव्या वर्षात शासनाकडून वाचनालयांना आर्थिक बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. (SAKAL Exclusive Libraries should get strength for Reading movement Rising inflation paltry subsidy in view of expenditure malegaon Nashik)

जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून नवीन वाचनालये अस्तित्वात आली नाहीत. मात्र जुन्या वाचनालयांच्या कार्यपद्धतीसह सतत उपक्रमशील असणाऱ्या ग्रंथालयाचा विस्तार सेवा-सुविधा, ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती व वेतनवाढीसह अनेक समस्यांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे वाचन चळवळीला बळ मिळत नाही.

खरे तर वाचनामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. शासनाकडून विशेष दिनाचे कार्यक्रम दिले जातात. वाचन प्रेरणा दिन, मराठी दिन, ग्रंथोत्सव, ग्रंथालय सप्ताह यांसारख्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची केवळ अपेक्षा केली जाते. कुठलीही आर्थिक तरतूद नसल्याने कुवत व क्षमता नसलेल्या वाचनालयांना असे कार्यक्रम परवडत नाहीत.

तळागाळापर्यंत नियोजनाची गरज

वाचनालयांसाठी वार्षिक वेतन व वेतनेतर अनुदान श्रेणीनुसार वेगवेगळे दिले जाते. वाढती महागाई, खर्च पाहता अनुदान तोकडे असल्याने अनेक बाबी साध्य होत नाहीत. ग्रामीण भागात असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतात.

संदर्भासाठी वाचनालये त्यांना मोठा हातभार लावतात. मात्र नजीकच्या काळात अनुदानाअभावी नवीन पुस्तके उपलब्ध होत नाही. तुटपुंज्या अनुदानातच ग्रंथालय व वाचनालयांवर शासनाचे उपक्रम लादले जातात.

यासाठी मदत वा अनुदानाची गरज, ग्रंथोत्सव केवळ जिल्हास्तरावर न होता आवर्तन पद्धतीने तालुका पातळीवर घेण्यात यावेत. वाचक चळवळी जोपासण्यासाठी वाचनालयांचा विस्तार, नव्या सुधारणा, सोयींची पूर्तता करावी.

ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष पुरवून कार्यवाहीची गरज आहे. वाचनसंस्कृतीचा प्रसार करण्यासाठी शासनस्तरावरून तळागाळापर्यंत नियोजन करण्यात यावे. पुस्तक खरेदीचे प्रमाण रोडावली आहे.

सोशल मीडियावरील विविध माध्यमांमुळे वाचन चळवळीचा गळा घोटला जातोय, सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीची खातरजमा न करता त्यावर विश्वास ठेवणे गैर असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त करतानाच सोशल मीडियावरील अपप्रचार व खोट्या माहितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

दृष्टीक्षेपात ग्रंथालय लेखाजोखा:

एकूण ग्रंथालये : २९४

जिल्हा ग्रंथालय : १

तालुका ग्रंथालये : अ-७, ब- ५

इतर वाचनालये : अ- १२, ब- ५९, क- ९७, ड- ११३

"ग्रामीण भागात वाचनालये असून मोबाईल व टीव्हीमुळे वाचक चळवळ मंदावली आहे. शासनाने यासाठी समाजातील घटकांच्या सहभागातून ही चळवळ विकसित करावी. महागाईच्या प्रमाणात ग्रंथपाल व कर्मचारी यांच्याकडे लक्ष पुरवावे, आधुनिक प्रशिक्षण द्यावे."

- किशोर पवार, सौंदाणे परिसर सार्वजनिक वाचनालय

"डिजिटल विकासामुळे पुस्तके मोबाईल मधून वाचण्याची वृत्ती वाढत चालली आहे. काळाची पावले ओळखून वाचनालयात आवश्यक ते बदल होणे गरजेचे आहे. पणती उपक्रमाच्या माध्यमातून वाचन चळवळ वाढावी म्हणून राष्ट्र सेवा दल मार्फत आम्ही पुस्तकं भेट उपक्रम राबवितो. अशा उपक्रमांनी वाचन चळवळ टिकेल."

- नचिकेत कोळपकर जिल्हा सचिव, राष्ट्र सेवा दल.

"वाचन व्यवस्था बळकट करण्यासाठी महिला व तरुणींसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू केली आहे. व्याख्यानमाला व छोट्या मोठ्या उपक्रमात तरुणींचा सहभाग वाढवला. ग्रामीण भागात महिला सहभाग वाढला तर वाचक चळवळ जोर धरेल."

- रेखा उगले, ग्रंथपाल, कॅम्प सार्वजनिक वाचनालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT