admission esakal
नाशिक

SAKAL Exclusive: संगणकासह संलग्न शाखांकडेच कल! सिव्हि‍लच्‍या 59 टक्‍के, मॅकॅनिकलच्‍या 48 टक्‍के जागा रिक्‍त

अरुण मलाणी

SAKAL Exclusive : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्येही विद्यार्थ्यांनी सिव्हिल, मॅकॅनिकल, इलेक्‍ट्रिकलसारख्या शाखांकडे पाठ फिरविल्‍याचे आकडेवारीतून समोर येत आहे. सिव्‍हिल शाखेच्‍या ५९ टक्‍के, मॅकॅनिकलच्‍या ४८ टक्‍के आणि इलेक्‍ट्रिकलच्‍या ३९ टक्‍के जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत.

दुसरीकडे संगणक व संलग्‍न शाखांना विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. (SAKAL Exclusive Tends to Affiliated Branches with Computers 59 percent of civil 48 percent of mechanical posts are vacant nashik)

राज्‍यभरातील सर्व विद्यापीठांशी संलग्‍न अभियांत्रिकी शिक्षणक्रमाच्‍या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यातून हे चित्र स्‍पष्ट झाले. गतवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी संगणक, आयटी व त्‍याच्याशी संलग्‍न असलेल्‍या शाखांची निवड केली.

विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स, मशिन लर्निंग, आयओटी यांसारख्या गेल्‍या काही वर्षांत सुरू झालेल्‍या अभ्यासक्रमांना जोरदार प्रतिसाद मिळालेला आहे.

सायबर सेक्‍युरिटी, ब्‍लोकचेन टेक्‍नॉलॉजी अशा आधुनिक शाखांतील प्रवेश क्षमता कमी असली, तरी बहुतांश शिक्षणक्रमांमध्ये जागा पूर्णपणे भरल्‍या गेलेल्‍या आहेत.

पारंपरिक मानल्‍या जाणाऱ्या सिव्हिल, मॅकॅनिकल व इलेक्‍ट्रिकलसारख्या शाखांमध्ये रिक्‍त जागांचे प्रमाण लक्षणीय राहिलेले आहे. गेल्‍या शैक्षणिक वर्षांतही या शाखांच्‍या रिक्‍त जागांचे प्रमाण लक्षणीय राहिले होते.

‘आयटी’तील पॅकेजचे आकर्षण...

आयटी कंपन्‍यांमध्ये अभियांत्रिकी पदवीधरांना आकर्षक पॅकेज दिले जात आहे. या पॅकेजच्‍या आकर्षणातून व चांगले करिअर करण्यासाठी धडपड करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचा कल या शाखांकडे राहत असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शाखानिहाय प्रवेशाची स्‍थिती अशी ः

शाखा प्रवेश क्षमता झालेले प्रवेश

सिव्हिल १७,२६८ ७,१०३

कॉम्‍प्‍युटर २५,८८७ २३,०६२

कॉम्‍प्‍यु. सायन्‍स ॲण्ड इंजि. १३,७९३ १२,३५३

कॉम्‍प्‍यु. सायन्‍स इंजि. (एआय) ३,३७३ ३,०९३

इलेक्‍ट्रिकल ११,७६० ७,१५२

ई ॲण्ड टीसी १८,८०६ १५, २२९

इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी १२,३५९ ११,५६५

मॅकॅनिकल २३,१९३ १२,०६५

आकडे बोलतात...

* एकूण ९८ शाखांमध्ये प्रवेशाची होती संधी

* १ लाख ५८ हजार ५८५ जागा होत्‍या उपलब्‍ध

* १ लाख १७ हजार ५८५ विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीस प्रवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SCROLL FOR NEXT