Vijay Thackeray esakal
नाशिक

SAKAL Exclusive: : F & O ट्रेडिंग शिकवणीतून विजय ठाकरेंचे तरुणाईला मार्गदर्शन

विजय ठाकरेंकडून शेअर मार्केट सुरू असताना धोरण विश्र्लेषणासह प्रात्यक्षिकांवर भर

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Exclusive : काही वर्षांपासून गुंतवणूकीबाबत सजग झालेल्‍या अनेकांकडून शेअर बाजाराचा मार्ग अवलंबला जात आहे. परंतु अपुऱ्या ज्ञानामुळे अनेकांना तोटा सहन करावा लागतो.

ही गोष्ट हेरून शेअर मार्केट सुरू असताना धोरण, विश्र्लेषणासह प्रात्यक्षिकांवर आधारित मार्गदर्शन नाशिकचे विजय ठाकरे करत आहेत. ‘फ्युचर ॲन्ड ऑप्‍शन’ प्रकारात ‘बँक निफ्टी’मध्ये नफा कमविण्यासाठी ते तरुणाईला शिकवणीतून मार्गदर्शन करत आहेत. (SAKAL Exclusive Vijay Thackerays guidance to youth through F & O trading teachings nashik)

भागभांडवल बाजारात व्‍यवहारासाठी आवश्‍यक असलेल्या डिमॅट अकाउंटची देशात नुकतीच विक्रमी संख्या नोंदविली गेली आहे. अनेकांकडून आता नियमित उत्‍पन्नासोबतच अतिरिक्‍त उत्‍पन्नासाठी शेअर बाजाराची वाट निवडली जात आहे.

परंतु बहुतांश गुंतवणूकदारांना अपुरे ज्ञान, अंदाजे व जोखीमीचे व्‍यवहार केले जात असल्‍याने तोटा सहन करावा लागत आहे. याउलट चालू घडामोडी व त्‍याचा शेअर मार्केटवर होणारा परिणाम व अन्‍य रणनीती समजल्‍यानंतर केलेला सौदा फायद्याचा ठरू शकतो.

आधी स्‍वतः सखोल ज्ञान प्राप्त करून घेताना आता विजय ठाकरे शिकवणीच्‍या माध्यमातून इतरांना प्रशिक्षित करत नफा कमविण्यासाठी प्रोत्‍साहित करत आहेत.

परदेशातीलही गुंतवणूकदार घेताय प्रशिक्षण

श्री. ठाकरे यांच्‍याकडे ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्‍ही माध्यमांतून शिकवणीद्वारे शेअर मार्केटचे प्रशिक्षण घेतले जाते आहे. भारतभरासह अन्‍य वेगवेगळ्या २२ देशांतील गुंतवणूकदार या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत.

यात प्रामुख्याने युरोपीय देशांसह दुबई, ऑस्‍ट्रेलिया आदी देशांतील गुंतवणूकदारांचा समावेश आहे. शेअर मार्केट सुरू होण्यापूर्वी सकाळी आठ वाजून ४५ मिनिटांपासून तर दुपारी साधारणतः तीनपर्यंत विश्‍लेषणावर आधारित ही शिकवणी घेतली जात आहे. एका बॅचला तीन महिन्‍यांचे प्रशिक्षण दिले जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चाळीस लाख तोटा ते दोन कोटींचा नफा

इतरांप्रमाणे विजय ठाकरे यांनीही सुरवातीच्‍या काळात शेअर मार्केटमध्ये अंदाजांवर आधारित गुंतवणूक केली. यापूर्वी कॉल सेंटरच्‍या व्‍यवसायातून झालेल्‍या बचतीचे पैसे गुंतवणुकीत लावताना त्‍यांना तब्‍बल ४० लाखांचा तोटा झाला.

परंतु यानंतर शास्‍त्रोक्‍त माहिती समजून घेताना त्‍यांनी आता जवळपास प्रत्‍येक व्‍यवहार नफ्याचा बनविला आहे. नुकत्याच संपलेल्‍या आर्थिक वर्षात त्‍यांनी दोन कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे.

शेअर इंडियाच्‍या सहकार्याने साकारला ‘प्रोबडेस्‍क’

गुंतवणूक कंपनी असलेल्‍या शेअर इंडियासोबत भागीदारी करताना श्री. ठाकरे यांनी नाशिकमध्ये पहिला प्रोबडेस्‍क साकारला आहे. याद्वारे कंपनीकडून उपलब्‍ध निधीतून श्री. ठाकरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली तज्‍ज्ञ सल्‍लागार बाजारात गुंतवणूक करत असतात.

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या प्रोबडेस्‍कची संकल्‍पना असून, टीमचा विस्‍तार करत तो ४५ पर्यंत नेण्याचा निर्धार श्री. ठाकरे यांचा आहे.

"बँक निफ्टीतील तांत्रिक माहिती समजून घेतल्‍यास केलेले व्‍यवहार फायद्याचे ठरू शकतात. गुंतवणुकीसाठी भांडवलाचे प्रमाण किती असावे, जोखमीचे व्‍यवस्‍थापन, नफ्याचा विनियोग कसा करावा, याबाबत प्रात्यक्षिकांवर आधारित मार्गदर्शन केले जात आहे. आतापर्यंत नऊ बॅचद्वारे सजग गुंतवणूकदार घडविण्याचा प्रयत्‍न केला आहे."

- विजय ठाकरे, सल्‍लागार व प्रशिक्षक, मोमेंटम ट्रेडिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT