SAKAL Impact case filed against those 6 circles violating order sound of DJ at ganesh visarjan procession esakal
नाशिक

SAKAL Impact: आदेश तुडविणाऱ्या त्या 6 मंडळांवर अखेर गुन्हे दाखल; डिजेचा दणदणाट भोवला

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर ठेवत आणि शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे वाजविण्यावर बंदी असताना शांतता समिती आणि गणेश महामंडळाचे पदाधिकाऱयांकडूनच विसर्जन मिरवणुकीत डिजेचा दणदणाट करणे 6 मंडळांना आणि डीजे वाजविणार्याना चांगलेच भोवले आहे.

याप्रकरणी भद्रकाली पोलिसात 5 तर नाशिकरोड पोलिसात एक असे सहा मंडळांचे अध्यक्ष व डिजेमलकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (SAKAL Impact case filed against those 6 circles violating order sound of DJ at ganesh visarjan procession nashik crime)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वाजविण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी राज्यातच नव्हे तर देशभरात आहे. तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच शहर पोलिसांनी शांतता समितीच्या बैठका घेत डीजे नवाजविण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तसेच सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाईचाही इशारा दिला होता. पोलिसांच्या या सूचनांना शांतता समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या गणेश मंडळांच्या संस्थापक पदाधिकाऱ्यांनी संमतीही दिली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून शहराच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे न वाजविण्याची परंपरा कायम राहील असे संकेत होते

मात्र विसर्जन मिरवणुकीतील आठ मंडळांनी डीजेचा दणदणाट करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धाब्यावर बसविले, तर पोलिसांच्या नाकावर डीजे वाजवीला यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात? याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

गुन्हे दाखल होणार का?

रवींद्र कुमार सिंगल हे पोलीस आयुक्त असताना गणेश विसर्जन मिरवणुकीत दंडे हनुमान मित्र मंडळाने डीजे वाजविला होता. या प्रकरणी गजानन शेलार यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविला नव्हता. यावेळी मात्र त्या मंडळासह आठ मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. त्यामुळे पोलिसांच्या आदेशाला न जुमानता मंडळांनी आदेशाचे उल्लंघन केले आहे.

यांच्याविरोधात गुन्हे

रोकडोबा मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल मदन जाधव व डी. जे. वादक वैभव गायकवाड, शिवसेवा मित्रमंडळचे अध्यक्ष संदीप कानडे व डीजे चालक चैतन्य गिरीष काळे, युवक मित्र मंडळ, मुंबईनाका अध्यक्ष किरण मोटकरी व डीजे चालक राहुल कुणाल जाधव, दंडे हनुमान मित्र मंडळ अध्यक्ष मंथन मोटकरी व डीजे चालक ऋषीकेश विजय इंगळे, युनायटेड फ्रेंड सर्कल अध्यक्ष मयुर वजरे व डीजे चालक सम्राद बंडुपंत आमले यांच्याविरोधात भद्रकाली, तसेच नाशिकरोड येथील गणेश मंडळ साईराज फाउंडेशन मित्र मंडळ, जेलरोड अध्यक्ष निखील दिपक सपकाळे व डीजे चालक गणेश वसंत शिरसाठ यांच्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारवाईचा फार्स!

डीजे वाजविणार्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी ही कारवाई फार्स ठरण्याची शक्यता अधिक आहे. गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी मिरवणुकीतील डीजे जप्त केलेले नाहीत.

यापूर्वी मिरवणुकीत डीजे वाजवलेल्या प्रकरणी तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करताना डीजे जप्त केले होते. तसेच मंडळाच्या अध्यक्षला अटकेची कारवाई टाळण्यासाठी बरीच 'मेहनत' घ्यावी लागली होती, ही बाब सर्वश्रुत आहे. असे असतानाही यावेळी मात्र केवळ पोलिसांनी दाखल केल्याने भूमिका संशयास्पद वाटते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT