SAKAL Impact Chinchwad Trust VIP darshan in temple pass closed after notice from nirbhaya foundation esakal
नाशिक

SAKAL Impact : देवस्थानांनी घ्यावा ‘चिंचवड ट्रस्ट’चा आदर्श! मंदिरातील VIP दर्शन पास केले बंद

नाशिकच्या निर्भया फाउंडेशनने चिंचवड देवस्थानाला नोटीस पाठविली असता, या देवस्थानाने व्हीआयपी दर्शन सशुल्क पास बंद केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संविधानाने देशभरातील सर्वांना समान दर्जा दिलेला असताना, देवाच्या मंदिरांमध्ये सर्रासपणे ‘व्हीआयपी’ दर्शन पासचा फलक लावून शुल्क आकारणी करून सर्वसामान्य भाविकांमध्ये भेदभावाची भावना येणे स्वाभाविक आहे.

यासंदर्भात नाशिकच्या निर्भया फाउंडेशनने चिंचवड देवस्थानाला नोटीस पाठविली असता, या देवस्थानाने व्हीआयपी दर्शन सशुल्क पास बंद केले आहेत.

देवस्थानच्या या निर्णयामुळे देवाच्या दारी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा तर मिळालाच आहे, शिवाय हा आदर्श राज्यातील व्हीआयपी दर्शन सशुल्क पास देणाऱ्या देवस्थानांनीही घेण्याचे आवाहन निर्भया फाउंडेशनने केले आहे. (SAKAL Impact Chinchwad Trust VIP darshan in temple pass closed after notice from nirbhaya foundation nashik news)

राज्यातील बहुतांशी मंदिरांमध्ये सशुल्क व्हीआयपी दर्शन पासेस घेणाऱ्या भाविकांसाठी देवाच्या दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था केली जाते. प्रत्यक्षात भारतीय संविधानाने देशातील प्रत्येकाला समान हक्क व समान दर्जा दिला आहे.

असे असतानाही काही मंदिरांमध्ये सशुल्क व्हीआयपी दर्शन पासेस देण्याने तासन्‌तास भाविकांच्या रांगेत ताटकळत थांबलेल्या भाविकांच्या मनामध्ये भेदभावाची भावना येणे स्वाभाविक आहे.

ही बाब भारतीय संविधानाची व नागरिकांच्या समान हक्कांची पायमल्ली करणारी आहे. याविरोधात फाउंडेशनचे कैलास दळवी यांनी थेऊरच्या चिंतामणी मंदिराच्या चिंचवड देवस्थानला नोटीस दिली होती.

यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’च्या १९ जानेवारीच्या अंकात ‘मंदिरांमधील ‘व्हीआयपी’ दर्शन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. याची गंभीर दखल चिंचवड देवस्थानने घेत पासेस बंदचा निर्णय घेतला. तसे पत्रच निर्भया फाउंडेशनला पाठविले आहे.

देवस्थानाचा निर्णय

चिंचवड देवस्थान विश्वस्तांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेत नोटिशीवर सविस्तर चर्चा केली.

यासंदर्भात विश्वस्तांनी सकारात्मक भूमिका घेत, चिंचवड देवस्थान अंतर्गत असलेल्या मंदिरांमधील व्हीआयपी सशुल्क दर्शन पास बंद करत असल्याचा निर्णय घेतला आणि तसे पत्रही निर्भया फाउंडेशनला देवस्थानचे कायदेशीर सल्लागार ॲड. मनोज वाडेकर यांनी पाठविले आहे.

"देवाच्या दारी सर्व समान असले पाहिजे, हीच निर्भया फाउंडेशनची भूमिका होती. चिंचवड देवस्थानने या भूमिकेचा आदर करीत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि व्हीआयपी सशुल्क दर्शन पास बंदचा निर्णय घेतला. त्याचे आम्ही स्वागतच करतो. राज्यात ज्या मंदिरांमध्ये असे दर्शन पास असतील त्यांनीही याचा आदर्श घ्यावा आणि व्हीआयपी सशुल्क दर्शन पास बंद करावेत."- ॲड. मनोज पिंगळे, कायदेशीर सल्लागार, निर्भया फाऊंडेशन, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT