City Scan esakal
नाशिक

SAKAL Impact: ...अखेर सिव्हिलमधील ‘सिटी स्कॅन’ झाले सुरू! 2 महिन्यांनंतर कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : दोन महिन्यांपासून बंद असलेली जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन यंत्रणा अखेर सुरू झाली आहे. दोन महिन्यांपासून सिटी स्कॅनअभावी रुग्णांना गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.

सिटी स्कॅन पुन्हा सुरू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जुनेच सिटी स्कॅन मशिन दुरुस्त करण्यात आले आहे. नवीन सिटी स्कॅन मशिनसाठी पाठपुरावा सुरू असला तरी त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळू शकलेला नाही. (SAKAL Impact City Scan in Civil started Operational after 2 months nashik)

ता. ११ जुलैला जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागासमोर असलेल्या विभागातील सिटी स्कॅन मशिन नादुरुस्त झाले होते. दुसऱ्याच दिवशी सप्तशृंग गडावर बस दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

त्याचवेळी रुग्णांच्या तपासणीदरम्यान सिटी स्कॅन यंत्रणेत बिघाड झाल्याचे समोर आले. तेव्हापासून सदरचे सिटी स्कॅन मशिन बंद होते.

त्यामुळे दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील दाखल रुग्णांना सिटी स्कॅन तपासणीची आवश्यकता भासल्यास त्या रुग्णास शालिमार चौकातील संदर्भसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात होते.

या दरम्यान जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून नादुरुस्त झालेले सिटी स्कॅन मशिन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच, वाढती रुग्णसंख्या पाहता नवीन सिटी स्कॅन मशिनची आवश्यकता असल्याने त्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून आरोग्य विभागाला प्रस्तावही देण्यात आला.

त्यासाठी पाठपुरावाही सुरू होता; परंतु त्यावर कोणताही प्रतिसाद आरोग्य विभागाकडून मिळू शकलेला नाही. दोन महिन्यांपासून सिटी स्कॅन मशिन दुरुस्तीचे काम सुरू होते; परंतु मशिन दुरुस्त होत नसल्याने जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची सिटी स्कॅन तपासणी रखडली होती.

दोन महिन्यांनी सिटी स्कॅन मशिनमधील दोष निष्पन्न होऊन तो दुरुस्त करण्यास संबंधित यंत्रणेला यश आले आहे. यामुळे पूर्ववत सिटी स्कॅन मशिनद्वारे रुग्णांची तपासणी सुरू झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रमाणापेक्षा अतिरिक्त ताण

जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिन हे २०१७ पासून कार्यान्वित आहे. साडेपाच वर्षांत या मशिनच्या माध्यमातून आतापर्यंत ३६ हजार रुग्णांचे सिटी स्कॅन करण्यात आलेले आहे. सरासरी दिवसाला २० ते २२ रुग्णांचे सिटी स्कॅन करण्याची क्षमता या मशिनची आहे.

प्रत्यक्षात या मशिनमध्ये दररोज ४० ते ६० रुग्णांचे सिटी स्कॅन रिपोर्ट काढले जातात. हे प्रमाण क्षमतेच्या दुपटीपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे सदरचे मशिन वारंवार नादुरुस्त होण्यामागे हेही एक महत्त्वाचे कारण आहे.

अतिरिक्त ताण

जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांसह प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडूनही केली जाते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टर नसताना रुग्णाचे सिटी स्कॅन करण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर पाठवून देतात.

प्रामुख्याने सिटी स्कॅन तपासणीची आवश्यकता असेल तर तपासणीचा सल्ला देणे अपेक्षित असताना वैद्यकीय निर्देशांना पायदळी तुडविले जाते. परिणामी, प्रमाणापेक्षा अधिक तपासणी झाल्याने अतिरिक्त ताण येऊन सिटी स्कॅन मशिन खराब होण्याचीही नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT