SAKAL Impact : जिल्हा परिषद कर्मचारी आता जिल्हा सरकारी व परिषद सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कामात कार्यालयीन वेळात दिसल्यास त्याच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज स्पष्ट केले.
तसे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहे. सर्व विभागप्रमुखांना पत्र काढत तत्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. (SAKAL Impact Disciplinary action for campaigning during office hour ZP CEO Mittal hits out at employees nashik news)
गत दोन आठवड्यांपासून बदल्यांच्या नावाखाली असणारे जिल्हा परिषद कर्मचारी काही दिवसांपासून जिल्हा सरकारी व परिषद सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कामात तेही कार्यालयीन वेळेत दिसत होते. याबाबत आज ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची मित्तल यांनी गंभीर दखल घेतली.
पतसंस्थेच्या निवडणुकीपासून यंदा जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्गात दोन गट पडले आहेत. बॅंकेच्या निवडणुकीत दोन्ही गट इरेला पेटले आहेत. त्यामुळे माघारी तसेच पॅनेल तयार झालेला नसतानाही कर्मचारी प्रचारात उतरले होते.
कार्यालयीन वेळात मुख्यालयातील बहुतांश कर्मचारी निवडणुकीच्या प्रचारात खुलेआम फिरत होते. कर्मचारी टेबलावर हजर राहत नसल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. श्रीमती मित्तल यांनी कर्मचारी व अधिकारी वर्गावर नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
‘कार्यालयीन वेळेत कर्मचारी निवडणूक प्रचारात असणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. एखादा अधिकारी, कर्मचारी रजेचा अर्ज न देता प्रचारात सामील झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अनेकांनी टाकली रजा
साधारण आठवडाभरापासून कार्यालयीन वेळेत प्रचारात दिसत असणारे कर्मचारी बुधवारी (ता.१४) कार्यालयात टेबलांवर बसून शिस्तीने काम करताना दिसले.
त्यामुळे एरव्ही मुख्यालयातील विभागांमध्ये कर्मचा-यांची असलेली नगण्य उपस्थिती बुधवारी पूर्ण दिसत होती. अनेक विभागातील कर्मचाऱ्यांनी निवडणुकीसाठी थेट रजेचा अर्ज टाकत रजेवर जाणे पसंत केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.