MSEDCL News esakal
नाशिक

Nashik : वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम

भाऊसाहेब गोसावी

चांदवड (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील विविध भागात महावितरणची धडक मोहीम, फौजदारी कार्यवाहीचा इशारा चांदवडचे उपअभियंता उमेश पाटील यांनी दिला आहे.

चांदवड तालुक्यातील विविध गावांमध्ये महावितरण मार्फत वीजचोरी पकडण्याची मोहीम राबविण्यात येत असून दिनांक ०९.११.२०२२ रोजी महावितरण नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.विद्युतकुमार विजय पवार यांनी तालूक्यातील सोग्रस गावातील विजचोरांना दणका देत धडक कार्यवाही केली व आठ ग्राहकांना २,२९,८९०/- रुपयांचे वीजचोरीचे बिल अदा करण्यात आले. (SAKAL Impact Mahavitran strike campaign against power thieves in Chandwad nashik news)

मोठ्या प्रमाणावर हिटर शेगडी वापरणाऱ्या, विजवाहक तारांवर आकडा टाकून तसेच इतर क्लृप्त्या वापरून बिनबोभाट विजचोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणने थेट कार्यवाही करत कार्यवाहीचा फास आवळला. अधिकृत कनेक्शन असूनही विविध मार्गांनी वीजचोरी करणाऱ्यांवर जप्तीची व दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.तालुक्यात ग्राह्कांमार्फत विजेचा मोठ्या प्रमाणात अनधिकृत वापर होत असल्यामूळे तालुक्यातील फिडरवर लोड आल्याने ते वारंवार ट्रीप होतात.

सिंगल फेज असताना कुणीही शेतीपंप, गिरणी चालवू नये. थ्री फेज सप्लाय असतांनाच शेतीपंप, गिरणी चालवाव्या. ज्या ग्राहकांचे अधिकृत विजकनेक्शन नाही अश्यांनी रीतसर कनेक्शन घ्यावे. असे आवाहन उपकार्यकारी अभियंता श्री. यु.डी. पाटील यांनी केले आहे. तसेच तालुक्यातील विविध गावांत वीजचोरी पकडण्याचे सत्र सुरूच राहील व वीजचोरांवर कार्यवाही तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा महावितरण कडून देण्यात आला.

दरम्यान प्रामाणिक व नियमित ग्राहकांकडून महावितरण कंपनीच्या या मोहिमेचे स्वागतच होत आहे. मात्र महावितरण च्या अधिका-यांनी व कर्मचाऱ्यांनीही फक्त विजचोरीमुळेच विजप्रवाह खंडीत होतो की महावितरणचाच भोंगळ व अनियमित कारभारामुळे याचाही विचार करावा. विजचोरी व विजगळती नक्कीच रोखली पाहिजे. यातून कुणाचे हात ओले होतात की काय याचाही शोध घेतला पाहिजे. आपल्या कामातील अनियमितता. विज वितरण व्यवस्थेतील अनेक त्रुटी त्या दुरुस्त करण्याची तसदी घेतली जात नाही. शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होत नसला की मग शेतकऱ्यांमध्ये महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी संताप होतो.

शेतकरी सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी करतात.मगच शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी कारवाई करण्यात येते. खरोखरच वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण ला प्रयत्न करावयाचे असतील तर ते नियमित असावेत. अनधिकृत वीज वापर करणा-यांना तात्काळ अधिकृतपणे वीज जोडणी द्यावी.. शेतकऱ्यांना वीज रोहित्र जळाल्यास ते तात्काळ द्यावे. वीजपंपाच्या वापरानुसार वीजबिल द्यावे. शेतीपंपाना तात्काळ मीटर द्यावे.

या आवश्यक बाबी महावितरण कडून होत नाही. फक्त शेतकऱ्यांना ऐन हंगामात वेठीस धरायचे एवढाच एक कार्यक्रम महावितरण च्या अधिका-यांनी राबविण्याचे ठरविले आहे. व्यावसायिक वीज ग्राहकांची वीजचोरी अधिकारी कर्मचारी यांना दिसत नाही का. त्यात कुणाचे हितसंबंध जोपासले जातात. या गोष्टींचाही महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचार करावा अशीच मागणी सामान्य वीज ग्राहकांची आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT