Traffic Police Action esakal
नाशिक

SAKAL Impact: बेशिस्तांवर पोलिसांकडून धडक कारवाई; आयुक्तांचे आदेश

लवकर विशेष मोहीम राबविणार

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : शहरातील बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांना विशेष मोहीम राबवून धडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी बुधवारी (ता. २८) ठिकठिकाणी ट्रीपल सीट, रॉंग साईड वाहन चालविणे, सिग्नल जंपिंग करणाऱ्या बेशिस्तांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला.

पोलिसांच्या या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले असले तरी सदर कारवाईत सातत्य व कठोरपणे राबविण्यात यावी, अशी अपेक्षा जागरूक नाशिककरांनी व्यक्त केली आहे. (SAKAL Impact Police crackdown on traffic rules breakers nashik police Commissioner Order)

शहरात शाळकरी मुलांचे अपघांचे प्रमाण वाढले आहे, मात्र वाहतुक नियमांची पायमल्ली करत शाळकरी मुले दुचाकीवर चौघेही असे सुसाट जात होते.

सोमवारी (ता. २६) अशोकस्तंभ येथे अपघातात बारावीचा विद्यार्थी ओम बुरकूल याचा मृत्यू झाला. तर, मंगळवारी (ता.२७) सकाळी अंबड-सातपूर लिंक रोडवर क्लाससाठी एकाच दुचाकीवरून तिघेजण जात असताना अपघातात दहावीचा विद्यार्थी सार्थक रहाणे हा जागीच ठार झाला तर दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होते.

या घटनांमुळे बेशिस्त वाहनचालकांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. वाहतूक पोलिसांची उदासीनता आणि पालकांची असलेली डोळेझाक यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर लगाम घालणार कोण, असा प्रश्‍न सुजाण नाशिककरांसमोर उभा राहिला.

यासंदर्भात ‘सकाळ’ मधून याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याची गंभीर दखल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली असून, बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध धडक कारवाई करण्यासंदर्भातील आदेश शहर वाहतूक शाखेला दिले आहेत.

त्या आदेशाची अंमलबजावणी ठिकठिकाणी दिसून आली. पोलिसांनी ठिकठिकाणी ट्रीपल सीट दुचाकीस्वार, विनाहेल्मेट, सिग्नल जंपिंग, रॉंग साइड वाहनचालकांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.

शहरातील महाविद्यालय परिसरातील रस्त्यावर विशेष मोहीम राबविण्यात आली. यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सातत्याची आवश्‍यकता

वाहतूक पोलिस शाखेकडून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध विशेष धडक कारवाईची मोहीम लवकरच राबविली जाणार आहे.

तसेच, बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध सुरू असलेली कारवाई सातत्याने केल्यास बेशिस्त वाहनचालकांमध्ये जरब निर्माण होऊन वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण घटेल अशी सुजाण नागरिकांना अपेक्षा आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाईत सातत्य राखावे अशी मागणी होते आहे.

एकीकडे कारवाई अन् दुसरीकडे....

गंगापूर रोडवर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध धडक कारवाई सुरू होती. विद्याविकास सर्कल येथे नियुक्तीवर असलेल्या महिला वाहतूक पोलिस अंमलदाराकडून ट्रीप सीट दुचाकीस्वारावर इ-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अशारीतीने या ठिकाणी बेशिस्तांविरोधात धडक कारवाई सुरू असताना, स्मार्ट रोडवर मात्र एकाच दुचाकीवरून चार मुले बसून प्रवास करीत होते. स्मार्ट रोडवर सीबीएस सिग्नल, मेहेर सिग्नल आणि अशोकस्तंभ येथे वाहतूक पोलिस नियुक्त असतानाही एकाच दुचाकीवरून चौघे बिनदिक्कत जात होते.

"बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम लवकरच राबविण्यात येणार आहे. जेणेकरून वाहनचालकांना शिस्त लागेल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहे."- मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT