sakal news impact signal on which seconds were not visible started to appear nashik news esakal
नाशिक

Sakal Impact : अन् सिग्नलवरचे ‘सेंकद’ दिसू लागले; वाहनचालकांकडून समाधान

सकाळ वृत्तसेवा

Sakal Impact : शहरातील सिग्नलवरची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी ठराविक सेकंदाच्या वेळा निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ठराविक सेंकदानंतर सिग्नल लाल आणि हिरवा होत असतो.

परंतु सध्या शहरातील बहुतांशी सिग्नलवरचे ‘टायमर’च बंद असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रमावस्था असायची. यासंदर्भात ‘सकाळ’ मधून यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच, ज्या सिग्नलवर सेकंद दिसत नव्हते ते दिसू लागल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, अद्यापही सिटी सेंटर मॉल सिग्नरवरील एका सिग्नलचा टायमर अद्यापही बंद आहे. (sakal news impact signal on which seconds were not visible started to appear nashik news)

नाशिक शहरात स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत त्र्यंबक नाका सिग्नल ते अशोकस्तंभ हा स्मार्ट रोड करण्यात आलेला आहे. या रोडवर त्र्यंबक नाका, सीबीएस आणि मेहेर या ठिकाणी सिग्नल यंत्रणा आहे. याच रोडवरील सर्वात रहदारीचा सीबीएस सिग्नल आहे.

मात्र या सिग्नलवर त्र्यंबक नाक्याकडून मेहेर सिग्नलकडे येताना सीबीएस सिग्नलवरील थांबण्याचे सेकंद दिसत नव्हते.

तर, उर्वरित तीन दिशेने सिग्नलवरचे सेकंद व्यवस्थित आहेत. बंद असलेल्या सिग्नलवरचे सेकंदाची वेळ सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे, शरणपूर रोडवरील महापालिकेनजिकचा टिळकवाडी सिग्नलच्या दोन दिशेच्या लाल दिव्याचे सेकंद बंद होते.

त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम होता. मात्र, ‘सकाळ’ मधील बातमीमुळे या दोन्ही सिग्नलवरील बंद असलेले सेकंद सुरू करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. त्रिमूर्ती रोडवर सिटी सेंटर मॉल येथे सिग्नल यंत्रणा असून या मार्गावर मोठी रहदारी असते. येथील थांबण्याची वेळी दीड मिनिटांची आहे.

मात्र याही सिग्नलवर त्रिमूर्तीकडून संभाजी चौकाकडे येणाऱ्या दिशेच्या सिग्नलवर सेंकद अद्यापही बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होतो.

त्यातच नवीन सिग्नलचे उभारलेले पोल जुन्या पोलच्या पुढे आहेत. जुनेच पोलवरचे सिग्नल सुरू असल्याने वाहनचालकांना सिग्नल दिसताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जुने पोलवरील सिग्नल बंद करून ते नवीन सिग्नलवर सुरू करावेत अशीही मागणी त्रस्त वाहनचालकांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT