sakal samvad on forest protection and reservation nashik  esakal
नाशिक

Sakal Samvad : वनसंपत्तीचे संवर्धन व संरक्षण प्रत्येकाची जबाबदारी : पंकज गर्ग

सकाळ वृत्तसेवा

"वनसंपत्ती ही पृथ्वीचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. वने असतील तरच आपलं जीवन सुखकर व निरामय होऊ शकते. वनसंपत्तीचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी ही वन विभागाबरोबरच नागरिकांचीही आहे. वनसंपत्तीचे नुकसान होणार नाही, वन्यजीव प्राण्यांना आपल्यापासून त्रास होणार नाही, या परिसरात प्रदूषण होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे." - पंकज गर्ग, उपवनसंरक्षक, नाशिक पश्चिम विभाग

(sakal samvad on forest protection and reservation nashik )

नाशिक पश्चिम विभागांतर्गत सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, नाशिक तालुका, दिंडोरीमधील काही भाग, ननाशी, सुरगाणा व बाऱ्हे आदी परिसर येतो. वन विभागातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. यात प्रामुख्याने आदिवासी भागांमध्ये इको टुरिझम संकल्पना निर्माण केली आहे. प्रामुख्याने अंजनेरी, हरिहरगड, दुगारवाडी, ब्रह्मगिरी, पहिने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांकडून नाममात्र शुल्क आकारून संकलित झालेला निधी आदिवासी पाड्यांवर विकासकामांसाठी वापरला जातो.

ज्यामुळे गावकऱ्यांनाही वनसंवर्धन व नैसर्गिक सौंदर्य रक्षण करण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहित केले जाते. याच भागातून वन विभागातर्फे मध संकलित केले जाते. पूर्वी २०० रुपये प्रतिकिलो मधविक्री होत असे, आता जवळपास अडीच ते तीन पटींनी अधिक दराने मधविक्री वन विभागामार्फत केली जाते.

बांबू शेती ही अत्यंत आवश्यक आहे. आमच्या भागात जवळपास ६० हेक्टर बांबू लागवड केली. त्यापासून विविध उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. वन धन विक्री केंद्रावर त्याची विक्रीही होते. अवैध वृक्षतोड प्रकरणात दोन राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या वन क्षेत्रात समन्वयातून पेट्रोलिंगला प्राधान्य दिले जाते. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन या अंतर्गत ग्रामपंचायतीला स्वस्त दरात रोपे वाटप केले जातात.

बॉश कंपनीला म्हसरूळ येथे २० हेक्टर जागा वननिर्मिती व संवर्धनासाठी दिलेली आहे. खासगी संस्थेचाही सेवाभावी तत्त्वावर वनसंवर्धनासाठी सहभाग करून घेतला जातो. वन्यजीव प्रथमोपचार केंद्र, गिधाड प्रजनन केंद्र लवकरच सुरू होणार आहे. बिबट्यापासून रक्षण करण्यासाठी व त्याचा मुकाबला करण्यासाठी विविध प्रकारची ट्रेनिंग नियमितपणे राबविली जातात.

नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याची समस्या आहे, तसेच त्यासाठी काही कारणे व उपायही आहेत. नाशिक शहरापासून जवळ असणाऱ्या तालुक्यांमध्ये उसाची शेती आहे. यात बिबट्याचा वावर आहे. तेथे वास्तव्य करणे व प्रजनन हे बिबट्यासाठी सोयीचे आहे. २०२० मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठ नागरिक मृत्युमुखी पडले होते.

तसेच, काही बिबट्यांचे अपघाती मृत्यू झाले होते. शेतीपासून जवळच घर असल्याने बिबट्यास पाणी व पाळीव प्राणी भक्ष करण्यासाठी सहज उपलब्ध आहे. खोलीत किंवा गाडीखाली लपण्यासाठी जागाही आहे. बिबट्यापासून बचावासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे. बिबट्या वावर क्षेत्रात रात्री बाहेर निघू नये. शेतीपासून घर दूर असावे. लहान मुलांना तर अजिबात बाहेर पाठवू नये.

बिबट्या सहसा त्याच्या डोळ्यांपासून कमी उंची असणाऱ्या प्राणी अथवा लहान मुले यांच्यावर अधिक प्रमाणात हल्ला करतो. त्याला त्यापेक्षा कोणी मोठे दिसले तर सहसा हल्ला करीत नाही. अचानक हल्ला झाल्यास टॉर्च अथवा मोबाईलवरील लाईट फ्लॅश ऑन ठेवावा. मानेला मफलर कायम असावे. बिबट्यासारखे हल्लेखोर प्राणी शांतताप्रिय असतात. त्यामुळे मोबाईलमधील म्युझिक अथवा आवाज गोंगाट केल्यास ते घाबरून, गोंधळून जातात व पळ काढतात.

नाशिक पश्चिम विभागात कर्तव्य पार पाडत असताना अनेक अनुभव आले. दुगारवाडी धबधबा येथे अतिपावसात २२ पर्यटक अडकले होते. त्यांना वाचविण्यासाठी आम्ही सायंकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. अतिशय अवघड परिस्थितीतून २१ जणांना पहाटे आम्ही सुरक्षित बाहेर काढू शकलो. एप्रिल २०२३ मध्ये पिंपळद, त्र्यंबकेश्वर व शिरसगाव परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला होता.

त्याच्या हल्ल्यात दुर्दैवाने चार नागरिकांना प्राण गमवावे लागले. आम्ही तेथे ६ एप्रिलला बिबट्याला पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले. आम्हाला एक बिबट्या सापडलाही; पण ड्रोनमुळे आमच्या लक्षात आले की हा हल्लेखोर बिबट्या नव्हे. अखेर हल्लेखोर बिबट्या मिळाला व २२ मेस हे ऑपरेशन संपले.

वन विभागाचा ‘१९२६’ हेल्पलाइन नंबर

वनक्षेत्रातून काहीही बाहेर आणण्यास मनाई आहे. असे केल्यास भारतीय वन कायद्यानुसार गुन्हाही दाखल होऊ शकतो. वन विभागाचा १९२६ हा हेल्पलाइन नंबर आहे. वन विभाग क्षेत्रात काही अवैध प्रकार लक्षात येत असेल किंवा कुठल्या प्राण्याला जर मदत हवी असेल तर कृपया या नंबरवर संपर्क साधावा. तत्काळ मदत अथवा प्रतिबंध करण्यासाठी कार्यवाही केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT