तुम्ही काँग्रेसमध्येच राहणार, घ्या शपथ!
जिल्ह्यातील जवळपास सगळेच आमदार सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे विरोधात कोणी बोलतही नाही आणि बोलणाऱ्याला बोलूही दिले जात नाही. याची प्रचीती सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या निमित्ताने नाशिककरांना झाली.
त्याचे झाले असे की, थोड्या उशिराने दाखल झालेले राष्ट्रीय पक्षाचे एकमेव आमदार साहेब बोलण्यासाठी उभे राहिले. पण त्यांना वरून टोपीवाले आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष महोदय बोलण्याची परवानगी देत नव्हते.
पालकमंत्रीही त्यांना खाली बसा म्हणून खुनावत होतेच! विरोधी पक्षात असल्यामुळे बोलू दिले जात नाही का, अशी विचारणा त्यांनी केली.
यावर ‘कांदे’ साहेब म्हटले, तुम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहात याची शपथ घ्या, मग आम्ही तुम्हाला बोलू देऊ... शपथ घेण्यापेक्षा न बोललेलं बरं म्हणून हे आमदारही खाली बसतात, आता बोला!
(SAKAL Special chalta bolta comedy tragedy political satire congress nashik)
कर्नतल ध्वनी म्हणजे...
नुकताच राज्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या उपस्थितीत शहरात एक समारंभ आयोजित केला होता. शिष्टाचाराचा भाग म्हणून सूत्रसंचालकांकडून हिंदीतून सूचना व संवाद साधला जात होता.
पण अगदी स्पष्ट हिंदी समजणं सभागृहात उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी अवघडच होते. सत्कारावेळी उपस्थितांनी प्रोत्साहनासाठी टाळ्या वाजवाव्यात, असे सूत्रसंचालकांना अपेक्षित होते.
त्यातच त्यांनी शुद्ध हिंदीत सूचना केली, ‘कर्नतल ध्वनी की आवाज नहीं आ रही’ असे नमूद करताच कुणाला काहीच समजले नाही अन् काही क्षणांसाठी विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला. अखेर सूत्रसंचालकांना इंग्रजी व मराठीतून सूचना केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.
गडी जागचा हलेना...
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे नेहमीच कोणी ना कोणी काहीतरी कामानिमित्ताने येतच असतात. असाच एक युवक एका अधिकाऱ्याच्या दालनात आला.
अधिकाऱ्यास वाटले काही कामासाठीच आला असेल. युवकाने त्याची ओळख करून ते तो काय काम करतो याचे तपशीलवार निवेदन केले. परंतु त्या युवकाचे नेमके काय काम आहे, याचा उलगडा काही त्या अधिकाऱ्यास होत नव्हता.
बराच वेळ होऊनही त्या युवकाचे बोलणेही संपत नव्हते अन् नेमका कोणत्या कामासाठी तो आला आहे, हेही कळत नव्हते. अधिकाऱ्याला भेटण्यासाठी दालनाबाहेर अनेकजण थांबूनही होते.
अधिकाऱ्यास काही कळेना म्हणून त्यांनी मध्येच बेल वाजवून शिपायाकडे बाहेर कितीजण थांबलेत, अशी विचारणाही केली. तरीही गडी जागचा हलेना... शेवटी अधिकाऱ्याने पुन्हा बेल वाजवून बाहेर आलेल्यांना एकेकास दालनात पाठविण्याची सूचना केली.
त्यानंतर तो युवक उठला आणि येतो म्हणत, सर काही काम असेल तर नक्की सांगा, असे म्हणून गेला. अधिकारी त्या पाठमोऱ्या युवकाकडे पाहत डोक्यालाच हात मारून घेतला.
नाही, तर आमच्या बातमीला टप्पा देतील
राजकीय नेते-पत्रकारांची म्हटले, तर मैत्री नाही, तर वैर... राजकीय, सामाजिक क्षेत्रात वावरत असताना नेते, पुढारी शक्यतो पत्रकारांशी वैर घेत नाही.
वैर घेतल्यास त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागते. या परिणामांची चिंता करत एक युवानेते पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिले. केवळ हजरच राहिले नाही, तर या युवा नेत्यास कार्यक्रमात बोलण्याची संधीही मिळाली.
पत्रकारांचा गवगवा करत या युवा नेत्याने त्यांना हळूच चिमटाही काढला. पत्रकारांच्या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांनी टप्पा मारला, तर ते नेत्यांच्या बातमीला टप्पा देतील, असे अगदी मिश्किलपणे ते बोलून गेले. त्यावर सभागृहात एकश हशा झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.