press Conference esakal
नाशिक

SAKAL Special: चालता- बोलता...!

सकाळ वृत्तसेवा

रातआंधळेपणाचा आजार आहे, लवकर आवरा

वेळेत कार्यक्रम सुरू न होणे ही आपल्‍याकडची सामान्‍य समस्‍या आहे. त्‍यामुळे एखाद्या कार्यक्रमाच्‍या दिलेल्‍या वेळेपेक्षा किमान अर्धा तास उशिरा पोचण्यावरच अनेकांचा कल असतो. पण जास्‍त विलंब होऊ लागला, की तारांबळदेखील उडते, याची प्रचीती एका विनोदी उदाहरणातून आली. त्याचे झाले असे, की पत्रकार परिषदेसाठी सर्व माध्यम प्रतिनिधी एकत्र आले होते. परंतु आयोजक काही कामात व्‍यस्‍त असल्‍याने त्यांना काहीसा वेळ होत होता.

वेळ सायंकाळची असल्‍याने सर्वांना पुढील कामाची गडबड होती. त्यातच लवकरात लवकर कार्यालयात पोचण्याच्‍या प्रयत्‍नात सर्वच पत्रकार होते. पण आता आयोजकांना सांगायचं काय, असा यक्षप्रश्‍न सर्वांना पडला. तेवढ्यात समन्‍वयकाला बोलवत एकजण म्‍हणाला, ‘ऐका ना, इथं तीन-चार जणांना रातआंधळेपणाचा आजार आहे. कार्यक्रम लवकर आटोपा, नाहीतर ऑफिसला तुमच्‍या गाडीतून सोडावे लागेल’ हे ऐकताच उपस्‍थितांमध्ये हशा पिकला. अन्‌ तंग झालेले वातावरण काहीसे हलकेफुलके झाले. (SAKAL Special chalta bolta comedy tragedy political satire nashik news )

तू लई मोठा आहे बाबा...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. निवडणुका नसल्या, तरी विद्यमानांसह इच्छुकांकडून निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. इच्छुक तर यासाठी अगदी कामाला लागलेले दिसत आहे. वॉर्ड असो, की गट यात जनसामान्यांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी सामाजिक, धार्मिक, साखरपुडे यांसारख्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत आहे. यात विद्यमान अन इच्छुक एकमेकांसमोर येण्यास टाळतात.

भेट झाली की सुटका करून घेतात. असेच एका साखरपुड्यात एक विद्यमान नगरसेवक व इच्छुक यांची भेट झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला, त्यावेळी इच्छुकांनी भाऊ तुम्ही झाल्या नवरात्रीतील कार्यक्रमाला आले नाही, असे सांगितले. त्यावेळी नगरसेवक याने तुझ्याकडे येत होतो. मात्र, तुझ्या कार्यक्रमाला थेट ठाकरे आलेले होते. लई मोठी व्यक्ती आलेली होती, यात तू कशाला मला ओळख देशील? तू लई मोठा आहे बाबा... असे सांगत कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकत, नगरसेवकांनी आपली सुटका करून घेत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

तू तरी मला पावशील का?

सध्या नाशिक शहर धार्मिक झाले आहे. एक भव्यदिव्य कार्यक्रम पाथर्डी भागात सध्या सुरू आहे. त्या व्यतिरिक्त छोटे कार्यक्रम गल्लीबोळात सुरू आहेत. या कार्यक्रमांमागे राजकीय किनार नक्कीच आहे. यावरून आता येत्या काळात निवडणुका या धार्मिक कारणावरून गाजतील, असे तरी दिसते. धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक जण निवडणुकीची तयारी करीत आहेत. प्रभाग निवडणूक लढविण्यासाठी धार्मिक कार्यक्रम करावे लागतील, असे एकाला कार्यकर्त्यांनी सांगितल्यावर त्याने लगेचच एका बाबाशी फोनवरून बोलणे केले.

अर्थात, डांबरट कार्यकर्त्यांनी फोन लावून बोलणे करून देण्यासाठी पुढाकार घेतला. धार्मिक कार्यक्रम कसा राहील. त्यात कोणते मुद्दे येतील, कुठल्या विषयावर बोलायचे एवढे बोलून झाल्यावर कार्यक्रम निश्‍चित झाला. प्रत्यक्षात कार्यक्रमाची तारीख, वेळ जवळ आली, त्या वेळी बाबाशी कॉन्टॅक्ट केल्यावर गल्लीतलाच ‘बाबा’नामक व्यक्ती निघाल्यावर इच्छुकांची चांगलीच पंचायत झाली. अखेरीस तू तरी मला पावशील का म्हणत बाबाला इच्छुकाने माफ केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT