बाप तो बापच असतो
बापाची चप्पल मुलाला येऊ लागल्यानंतर मुलगा समजदार झाला, असे समजून त्याला त्याप्रमाणे कुटुंबात व समाजात वागणूक मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा असते. त्याप्रमाणे कुटुंबाकडून वागणूकही मिळते. मात्र जगात अनुभव महत्त्वाचा असतो.
अनुभव हेच शिक्षण असल्याचे तज्ज्ञ मानतात. मुलाला बापाची चप्पल आली म्हणजे त्याला तेवढा मान मिळाला पाहिजे, एवढेच गृहीत धरणे अपेक्षित असताना मुलांकडून मात्र बापाला ‘ओव्हरटेक’ करण्याची नवीन पद्धत रूढ झाली आहे.
अशाच एका प्रसंगात मुलगा वडिलांकडून चारचाकी गाडीची चावी घेऊन दिवसभर फिरला. सायंकाळी दुकानातून घरी जाताना मुलाने आपली गाडी घेऊन मोठा फेरफटका मारल्याने आता डिझेल भरावे लागेल, हे लक्षात आले.
मुलाला देखील ही बाब माहीत असताना वडिलांना आता गाडी तुम्ही घेऊन जा, असा आग्रह धरला. मात्र बाप तो बापच असतो.
बापाने अर्थातच वडिलांनी तू गाडी घेऊन जा, मी आईला घरी जाऊन ओवळण्यासाठी ताट सांगतो, असे गौरवाचे शब्द काढून बापाने मुलाच्या गळ्यात डिझेलचे घोंगडे मारले. (SAKAL Special chalta bolta comedy tragedy political satire nashik)
दिसले दोडी की मारली उडी..!
जिल्ह्याचा सर्वसमावेशक विस्तार होत असून, यावरच एका समूहात चर्चा रंगली होती. ओझरप्रमाणे शिर्डीलाही विमानतळ झाले असून, त्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विमानतळावर विमान उतरण्याआधी घिरट्या घालत असल्याने ते सिन्नर भागातील दोडी व सभोवतालच्या गावांमध्ये सहजरीत्या पाहायला मिळतं. मग काय त्यावर उपस्थितांची चर्चा सुरू झाली.
त्यावर ग्रामस्थ म्हणाले, ‘‘शिर्डी आम्हाला जवळ असल्याने आमच्या गावचे लोक आता ओझरऐवजी शिर्डीला उतरून मग गावात येतात.’’
त्यावर दुसरे उत्तरले, ‘‘विमानतळावर विमान उतरल्यानंतरच घरी येतात ना की घिरट्या मारतांना गावावर विमान आल्यानंतर दिसले दोडी की मारली उडी... असे तर काही करत नाही ना..’’ त्यांच्या या प्रश्नावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.